इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधील डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्या असून त्यामुळे जो बायडन यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.
हंटर बायडन यांनी हा लॅपटॉप रिपेअर करण्यासाठी दिला होता. मात्र नंतर ते याबद्दल विसरुन गेले. तर दुसरीकडे अनेक महिने हा लॅपटॉप घ्यायला कोणी आलं नाही म्हणून दुकानदाराने यामधील डेटा तपासून पाहिला. डेटा संवेदनशील असल्याने या दुकानदाराने एफबीआयला संपर्क केला. मात्र हा डेटा एफबीआयला देण्याआधी त्याची एक कॉपी बनवून घेण्यात आली. याच कॉपीमधून हा डेटा लिक झाल्याची शक्यता आहे.
उजव्या विचारसणीच्या मार्को पोलो ग्रुपने हे फोटो सार्वजनिक केले आहेत. यामध्ये हंटर बायडन हे अंमली पदार्थांचे सेवन करतात, शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांबरोबर नग्नावस्थेत दिसत आहेत. तसेच हंटर यांच्या लॅपटॉमधील काही कौटुंबिक फोटोही या ग्रुपने लिक केले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपने एक वेबसाईट सुरु करुन त्यावर हे फोटो अपलोड केले आहेत.
एकूण ७०३२ फोटो व्हायरल
हंटर बायडन यांचे व्हायरल झालेले फोटो २००८ ते २०१९ दरम्यानचे आहेत. हे फोटो चीन, लंडन, पॅरिस, रोम, हवाई बेटे, काबो सान लुकास, कोसोवो यासारख्या ठिकाणी काढण्यात आले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंपैकी ७०३२ फोटो हे हंटर बायडन यांच्या मॅकबूक प्रो आयफोटो अॅपमधून लिक झालेले आहेत. त्याचप्रमाणे हंटर बायडन यांच्या आयफोन एक्सएसच्या बॅकअपमधून १,८३२ फोटो, ४२८ लाइव्ह फोटो, टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवण्यात आलेले ६७४ फोटो, ५७९ स्क्रीनशॉट आणि ४० व्हॉट्सअप फोटोंचा समावेश आहे. अन्य १११ फोटोंचाही यात समावेश आहे.
USA President Joe Biden Laptop Data Leak