इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकन हवाई दलाच्या एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पाय अडकून पडल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन हवाई दलातील नवीन भरती झालेल्या जवानांना पदवी बहाल करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. यूएस एअर फोर्स अकादमीमध्ये भाषण दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका कॅडेटशी हस्तांदोलन केलं. यानंतर दुसरं पाऊल टाकल्यानंतर ते लगेचच अडखळले आणि खाली पडले.
बायडन खाली पडल्यानंतर लगेच, त्यांनी एका वस्तूकडे बोट दाखवलं. या वस्तूमुळे बायडन अडखळून खाली कोसळले होते. स्टेजवर एक छोटी काळ्या रंगाची वाळूची पिशवी ठेवण्यात आली होती. या पिशवीला अडखळल्यावर जो बायडन खाली कोसळल्याचे म्हटले जात आहे. ईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी बायडन यांच्यासोबत घडलेल्या या दुर्घटनेनंतर लगेचच ट्वीट करत त्यांच्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की जो बायडन ठीक आहेत.
आजवरचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष
जो बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. २०२४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बायडन पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. जो बायडन नुकतेच जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या जी ७ शिखर परिषदेत अडखळले होते. मात्र, त्यावेळी ते पडता-पडता बचावले. दरम्यान, २०२० साली बायडन यांच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळताना बायडन पडले होते, तेव्हा त्यांचा पाय मोडला होता.
USA President Joe Biden Fall in Ceremony