इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबद्दल जगभरात सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच आता अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. नासा ही संस्था पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवणार आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी भूगर्भशास्त्र संघाची निवड केली आहे, जी यशस्वी मोहिमेसाठी धोरण तयार करेल. विशेष म्हणजे १९६९ मध्ये मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. त्यावेळी नील आर्मस्ट्राँग आणि त्याचे साथीदार गेले. तथापि, १९७२ नंतर चंद्रावर एकही मानव मोहीम पाठविली गेली नाही.
नासाचे म्हणणे आहे की, चंद्रावर मानवी वसाहत करण्यासाठी शास्त्रज्ञांना संशोधन करायचे आहे. त्यामुळे नासाची आर्टेमिस III मोहीम चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होणार आहे. यासोबतच नासाने चंद्रावर पाठवलेल्या टीममध्ये महिलांचाही समावेश केला जाईल आणि हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ पाठवले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नासाचे सायन्सचे सहयोगी प्रशासक डॉ. निकी फॉक्स म्हणाले की, विज्ञान आर्टेमिसच्या स्तंभांपैकी एक आहे. ते म्हणाले की, भूगर्भशास्त्र संघ ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या योजनेचे नेतृत्व करेल. मिशन यशस्वी कसे करता येईल याची टीम खात्री करेल.
मुख्य अन्वेषक डॉ. ब्रेट डेनेवे यांच्या नेतृत्वाखाली आर्टेमिस-III भूगर्भशास्त्र संघ काम करेल. भूगर्भीय विज्ञान उद्दिष्टांचा शोध घेण्यासाठी आणि पृष्ठभाग भूविज्ञान मोहिमेची रचना करण्यासाठी एजन्सीसोबत हे मिशन जवळून काम करेल. तसेच, जेव्हा हे लोक चंद्रावर पोहोचतील तेव्हा त्यांचा वापर केला जाईल. त्याचवेळी उप-सहयोगी प्रशासक डॉ. जोएल केर्न्स म्हणाले की, या संघाची निवड हा आर्टेमिस-III साठी आमच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.”आर्टेमिस III भूगर्भशास्त्र संघासह, आम्ही याची खात्री करत आहोत की नासा एक मजबूत चंद्र विज्ञान कार्यक्रम तयार करेल,” असे ते पुढे म्हणाले.
USA NASA ArtemisIII mission Geology Team Announcement
The future astronauts of the NASA ArtemisIII mission to the Moon will perform geology tasks designed by a newly-announced team of 12 lunar scientists
The team will plan moonwalk activities including sampling, imagery, and taking measurements.