इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण जगाचे नेतृत्व आपल्याकडेच आहे, असा नेहमीच उल्लेख करणारे अमेरिकन प्रशासन, ‘आम्ही जगातील सर्व दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी नेहमीच सज्ज आहेत, असे म्हणत असते. त्यामुळेच अमेरिकेला ‘जगाचा फौजदार ‘ असे संबोधले जाते. सुमारे २५ वर्षापासून जगात अनेक देशात दहशतवादी हल्ले झाले मात्र २००१ मध्ये अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक होता. तेव्हापासून अमेरिकेने दहशतवादाचा समुळ नायनाट करण्याची जणू काही भीष्म प्रतिज्ञाच घेतली आहे, त्याचा प्रत्यय वारंवार येतो. आताही अमेरिकेने अल कायद्याच्या म्होरक्यालाच ठार केले आहे.
आता अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी ‘अल जवाहिरी ‘ याला ठार मारण्यात आले आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करून मोठी कारवाई केल्याची घोषणा व्हाईट्स हाऊसने केली आहे. कुख्यात दहशतवादी अल-आदेल याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे. अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर लगेचच संघटनेनं नवीन प्रमुख निवडला आहे.
लादेननंतरचा अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठं यश आहे.
या दहशतवादाचा इतिहास बघितला असता, अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींत घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटॅगॉन मध्ये घुसवले गेले व चौथे विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण २,९७४ बळी गेले.
२०११ मध्ये ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर अल कायदाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. अफगाणिस्तानात सीआयएनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा झाल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. सन २००१ मध्ये अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. ११ सप्टेंबर २००१ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. यामध्ये सुमारे ३ हजार अमेरिकन नागरिक मारले गेले. या हल्ल्यांमागील अल्-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनने त्यावेळी अफगाणिस्तानात आश्रय घेतलेला होता.
अफगाणिस्तानात त्यावेळी तालिबानची राजवट होती आणि त्यांनी या हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या ओसामा बिन-लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायला नकार दिला. त्यानंतर महिनाभरातच अमेरिकेने अफगाणिस्तानात हवाई हल्ले सुरू केले, अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रांचं सैन्य अफगाणिस्तानात दाखल झालं आणि या युद्धाला सुरुवात झाली. तालिबानला यानंतर लवकरच अफगाणिस्तानातली सत्ता सोडावी लागली. पण तालिबानच्या अफगाणिस्तान मधील दहशतवादी कारवाया आणि हल्ले सुरूच राहिले.
महत्वाचे म्हणजे ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतरची आताची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका देण्यात आला आहे. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं. दरम्यान, व्हाईट हाऊसने अफगाणिस्तानात एक लक्ष्य पूर्ण करण्यात आल्याचा दावा केला असला तरी अमेरिकन सरकारने जवाहिरीला मारल्याचा कोणताही दावा केलेला नाही.
राष्ट्रपती जो बायडन हे अफगाणिस्तानात अल कायदाच्या विरोधातील दहशतवाद विरोधी अभियानाबाबत संध्याकाळी 7.30 वाजता माहिती देतील, असं व्हाइटस हाऊसने म्हटलं आहे. इजिप्तमधील डॉक्टर आणि सर्जन अयमान अल जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001च्या हल्ल्यात समन्वय साधण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी चार विमानांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तीन हजार लोक मारले गेले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये घुसून सीआयएद्वारे ड्रोन हल्ला केला आहे.
On Saturday, at my direction, the United States successfully conducted an airstrike in Kabul, Afghanistan that killed the emir of al-Qa’ida: Ayman al-Zawahiri.
Justice has been delivered.
— President Biden (@POTUS) August 1, 2022
संयुक्त राज्य अफगाणिस्तानात अलकायदाने एक महत्त्वपूर्ण लक्ष्य म्हणून दहशतवाद विरोधी अभियान हाती घेतले असून हे ऑपरेशन यशस्वी ठरलं. या हल्ल्यात एकाही नागरिकाला काहीही झालं नाही. शेरपूरच्या एका घराला रॉकेटद्वारा लक्ष्य करण्यात आलं. हे घर रिकामे असल्याने कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, असं अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी सांगितलं. तर, तालिबानच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काबुलवरून कमीत कमी एक ड्रोन उडाल्याची माहिती मिळाली होती.
रिवॉर्डस फॉर जस्टिस वेबसाइटच्या मते, जवाहिरीने वरिष्ठ अलकायदा सदस्यांच्या साथीने यमनमध्ये अमेरिकेच्या कोल नौसैनिक पोतवर 12 ऑक्टोबर 2000 रोजी हल्ल्याचं षडयंत्र रचलं होतं. या हल्ल्यात 17 अमेरिकन नाविक ठार झाले होते. या हल्ल्यात 30हून अधिकजण जखमी झाले होते. 7 ऑगस्ट 1998मध्ये केनिया आणि तंजानियामध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अल जवाहिरीला दोषी ठरवण्यात आलं होतं. या हल्ल्यात 224 लोक मारले गेले होते. तसेच 5,000 हून अधिक लोक जखमी झाले होते.
अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएनं अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर रविवारी ड्रोन स्ट्राईक केला. त्याच हल्ल्यात जवाहिरी मारला गेल्याचे सांगितले, दहशतवादविरोधी कारवायांचा भाग म्हणून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर दिली. तालिबानचा प्रवक्ता जबीहउल्लाह मुजाहिदनं हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुजाहिदनं या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेनं केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन असल्याचे त्याने म्हटले आहे.
USA Drone Attack Terrorist and AL Queda Chief Al Zawahiri Killed