न्यूयॉर्क/वॉशिंग्टन (अमेरिका) – युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आता अमेरिकेतूनही चिंतानजक वृत्त समोर येत आहे. अमेरिकेत शाळा उघल्या असून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात दिवसातच तब्बल दीड लाख विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ही बाब अन्य देशांनाही इशारा देणारीच आहे.
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) च्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात दि. 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान सुमारे 1 लाख 41 हजार मुलांना संसर्ग ला. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत मुलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण 32 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच गेल्या आठवड्यात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकरणांपैकी एक तृतीयांश मुलांशी संबंधित आहेत. यात एकूण लोकसंख्येच्या 22 टक्के मुले आहेत. त्यानुसार 68 लाखांहून अधिक मुलांना संसर्ग झाला आहे.
मृत्यूचा धोका कमी
सदर अहवालानुसार, संसर्गामुळे मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अमेरिकेच्या सहा राज्यांमध्ये कोरोनामुळे एकाही मुलाचा मृत्यू झालेला नाही. या मुलांमध्ये संसर्गाची सामान्य लक्षणे दिसतात. ते थोडेसे आजारी पडतात. याचे कारण म्हणजे येथे मुलांना इन्फ्लूएंझा, मेंदुज्वर, कांजण्या आणि हिपॅटायटीससाठी वेळोवेळी लशीकरण केले जाते, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
ऑक्टोबरमध्ये 172 मुलांचा मृत्यू
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार संसर्ग झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये दि. 5 ते 11 वयोगटातील 8,300 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 172 जणांचा मृत्यू झाला. देशात 2,300 शाळा या साथीच्या रोगाच्या वेगाने बंद झाल्या होत्या, मात्र त्यामुळे 1.2 दशलक्ष मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. आता शाळा सुरू झाल्यामुळे संसर्ग अनियंत्रित होऊ लागला आहे, तो येणाऱ्या काळाचा इशारा ठरत आहे.
भारतातही मुलांमध्ये संसर्ग
देशात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. ओडिशाच्या शाळेत, 53 मुलींसह 22 एमबीबीएस विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाची बाधा झाली आहे. जयपूरच्या जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूलच्या 12 मुलांना मंगळवारी संसर्ग झाला आहे. त्याच वेळी, 17 नोव्हेंबर रोजी अडीच वर्षांच्या मुलाचा संसर्गाने मृत्यू झाला. गुजरातमध्ये 18 महिन्यांत 0 ते 14 वर्षे वयोगटातील 19 हजार मुलांना संसर्ग झाला आहे.
सर्व वयोगटातील मुले बाधित
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे संचालक डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले केले की, अलीकडच्या काळात सर्व वयोगटातील मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, ही चिंताजनक परिस्थिती आहे. डॉ. अँथनी फौसी म्हणतात की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे विषाणू फिरत आहेत. मुलांबाबत अत्यंत काळजी घ्यावी लागेल, अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. तथापि, संसर्गाचा वेग वाढल्याने दाखल झालेल्या मुलांची संख्या वाढू शकते.