इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीन कधी काय करेल सांगता येत नाही. एकतर अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग कुठल्या कामांसाठी करेल, याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. कोरोनाच्या प्रकोपासाठी तर आजही संपूर्ण जग चीनलाच दोषी ठरवतय. अशात आपल्या हद्दीत येऊन हेरगिरी करणारा चीनचा बलून अमेरिकेच्या नजरेस पडला आणि त्यांनी जास्त विचार न करता त्याला उध्वस्त केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वादाची ठिणगी फुटली आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी हा बलून कसा उद्धवस्त केला त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद जगजाहीर आहे. एवढे की अमेरिकन कंपनी अमेझॉन चीनच्या हद्दीतही प्रवेश करू शकले नाही. अमेझॉनला टक्कर देण्यासाठी चीनने अलीबाबा नावाची अगदी तशीच सर्व्हिस सुरू केली आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे अमेरिका चीनमध्ये जाऊन उद्योगधंदा करण्याचा विचार मर्यादेतच करू शकते. पण चीन मात्र आपल्या सर्व मर्यादा तोडायला तयारच असतो. काही दिवसांपासून अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांना आकाशात ढगांच्या आकाराचे बलून्स दिसत होते. सुरुवातीला ते ढगच वाटले. मात्र अगदी ढगांचे आकार असलेले, ढगांसारखे ओबडधोबड असलेले हे चक्क बलून्स आहेत, हे कळायला थोडा वेळ लागला. पण ज्या क्षणाला याची खात्री पटली त्या क्षणाला अमेरिकेने ते बलून्स फोडले आणि लांब अटलांटिक महासागरात नेऊन पाडलं. अमेरिकन हवाई दलाच्या एफ-२२ रॅप्टर एअरक्राफ्टरच्या मदतीने चीनचं हे बलून उध्वस्त केलं आहे.
चीनची सटकली
अलटा चोर कोतवाल को डांटे अशी प्रचिती देणारी भूमिका चीनने व्यक्त केली आहे. स्वतःच हेरगिरी करण्यासाठी बलून्स सोडणारे चीन आता म्हणतय की हे बलून्स चुकीने अमेरिकेच्या हद्दीत गेले. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मानकांचं उल्लंघन केलं आहे. हे केवळ एका अपघातामुळे घडलं होतं. सिव्हिलीयन एअरशीप चुकून चुकून अमेरिकेच्या हवाई हद्दीत गेलं होतं आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली होती, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.
https://twitter.com/manojthaker33/status/1623169879590469632?s=20&t=ntrLRuzlhDJBUOGAHOAdUg
USA China Spy Balloon Fighter Aircraft Video