नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या उद्योग जगतासाठी एक सकारात्मक बातमी आहे. अमेरिकन कंपनी असलेल्या जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेसने नाशिकमध्ये अडीच कोटी रुपयांची (२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) एवढी गुंतवणूक केली आहे. तशी माहिती कंपनीने दिली आहे.
जिंदाल हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (JHESL) ने जॉईंट व्हेंचरद्वारे नाशिकमध्ये ऑइल कंट्री ट्युब्युलर गुड्स (OCTG) थ्रेडिंग प्लांट उभारण्यासाठी ही गुंतवणूक केली आहे, तशी माहिती कंपनीचे ग्रुप सीईओ नीरज कुमार यांनी दिली आहे. जिंदाल सॉ या कंपनीने हंटिंग एनर्जी सर्व्हिसेससह नवी कंपनी स्थापन केली आहे. त्याअंतर्गत ऑइल कंट्री ट्युब्युलर गुड्स (OCTG) थ्रेडिंग प्लांट साकारण्यात आला आहे. पाईपची निर्मिती करणाऱ्या जिंदाल सॉ या कंपनीने हंटिंगसोबत २०१९मध्ये भागीदारी केली. त्याद्वारे भारतात तयार केलेले सीमलेस केसिंग आणि टयूबिंग तयार करण्यासाठी पेटंट कनेक्शन तंत्रज्ञान मिळवले होते.
भारतातील तेल आणि वायू क्षेत्रातील OCTG मार्केटमध्ये प्रीमियम कनेक्शनसह पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि पुरवठा करणारी JHESL प्लांट ही भारतातील एकमेव सुविधा आहे. प्लांटची वार्षिक क्षमता ७० हजार मेट्रिक टन एवढी आहे. यासंदर्भात कुमार म्हणाले की, सध्याच्या घडीला देशांतर्गत बाजारपेठेत या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात व्यवसायाची संधी मिळते. भारत दशलक्ष डॉलर्स किमतीची OTGC उत्पादने आयात करतो. तेल आणि वायू क्षेत्रात कार्यरत देशांतर्गत कंपन्यांना स्पर्धात्मक किमतीत देशांतर्गत उत्पादने मिळू शकतील, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या भागीदारीमध्ये जिंदाल SAW ची ५१ टक्के हिस्सेदारी असेल, तर हंटिंग एनर्जीचा उर्वरित ४९ टक्के हिस्सा असेल.
जिंदाल सॉ या कंपनीचे अध्यक्ष पी आर जिंदाल म्हणाले की, “या उपक्रमामुळे हा गट सरकारच्या आत्मनिर्भर उपक्रमात सहभागी होऊ शकेल. अत्याधुनिक सुविधेमुळे आयातीवर अवलंबून असलेल्या कंपन्यांना जागतिक दर्जाची उत्पादने उपलब्ध होतील.
हंटिंग एनर्जीचे सीईओ जिम जॉन्सन म्हणाले की, “आम्ही प्रगती करत असताना अधिक प्रगत कनेक्शन तंत्रज्ञान सादर करण्यास उत्सुक आहोत. मला विश्वास आहे की ही भागीदारी मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल. तसेच, स्थानिक तेल आणि वायू (O&G) उद्योगाला फायदे मिळवून देईल. भारताच्या ऊर्जा संक्रमणामध्ये देखील भूमिका बजावेल.”
जिंदाल सॉ ही भारत, अमेरिका, युरोप आणि युएई मध्ये उत्पादन सुविधांसह स्टील पाईप उत्पादने, फिटिंग्ज आणि अॅक्सेसरीजची निर्माता आणि पुरवठादार आहे. तर, हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस प्रीमियम, हाय-एंड डाउनहोल मेटल टूल्स आणि विहिरीचे बांधकाम, पूर्णत्व आणि विहिरीच्या जीवनचक्राच्या हस्तक्षेपाच्या टप्प्यांमध्ये हायड्रोकार्बन काढण्यासाठी आवश्यक घटक तयार करते.
US Based Company Investment In Nashik New Plant Industry