इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेले काही दिवस उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. तशी तिच्या कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण काही दिवसांपासून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. ऊर्फीनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या वादात राज्य महिला आयोगानेही आपली भूमिका मांडली होती. या वादामुळे ऊर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. आता ऊर्फी अडचणीत आली आहे. ऊर्फीला मुंबईत राहण्यासाठी घर हवं आहे, ते देखील भाड्याने. पण सध्या तिला कुणीही घर देत नाहीये.
अतरंगी फॅशन आणि वादांमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदला सध्या एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. उर्फीला मुंबईत राहण्यासाठी भाड्याने घर हवं आहे. पण तिला कुणीही घर देत नाहीये. यासंदर्भात तिने एक ट्वीटही केलं असून मुंबईत भाड्याने घर मिळत नसल्याची माहिती दिली आहे.
https://twitter.com/uorfi_/status/1617869922419478531?s=20&t=LBs9lJU20VTMUOUNzdNtSw
ऊर्फी म्हणते की, माझे कपडे तसेच धर्मामुळे मला घर भाड्याने मिळत नाही. “माझ्या कपड्यांमुळे मुस्लिम मालक मला घर भाड्याने देत नाहीत, आणि मी मुसलमान असल्याने हिंदू मालक मला घर भाड्याने देत नाहीत. तर काही मालकांना मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांची भीती वाटते. थोडक्यात काय तर मुंबईत भाड्याने अपार्टमेंट शोधणे माझ्यासाठी खूप अवघड झाले आहे, असं उर्फीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नेहेमीप्रमाणेच या ट्विटवर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऊर्फीला घर भाड्याने न मिळणं चुकीचं आहे, असे काहींनी म्हटले आहे. तर, काही जणांनी मात्र ‘तू असे विचित्र कपडे घालण्याआधी सर्व गोष्टींचा विचार करायला हवा होतास’, असं म्हटलं आहे. अनेक नेटकरी तिला इतर शहरांमध्ये घर हवं असल्यास मदत करू, असं सांगत आहेत. दरम्यान, चित्रा वाघ यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर तिला धमक्याही आल्या होत्या. तसेच तिच्याविरोधात तक्रारही झाली होती, त्यामुळे तिला महिला आयोगात जबाबही नोंदवावा लागला होता.
https://twitter.com/uorfi_/status/1618155707425255425?s=20&t=LBs9lJU20VTMUOUNzdNtSw
Urfi Javed Mumbai Rent Home Problem