इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जिद्द आणि चिकाटी असेल तर जिवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे म्हटले जाते. आजच्या काळात स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात कार्यरत दिसतात, परंतु अद्यापही त्यांच्यावर अनेक बंधने सामाजिक बंधने दिसून येतात. मात्र त्यावर मात करीत काही महिला पुढे जातात आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. उषा यादव या महिलेचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
यूपीएससीची परीक्षा अत्यंत कठीण समजली जाते. अनेक तरुण-तरुणी प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करतात. परंतु सर्वांनाच यश मिळते असे नाही. मात्र एका महिलेने तब्बल पाच वेळा ही परीक्षा दिली. त्यात तिला अपयश आले. पण तिने हार मानली नाही, लग्नानंतरही स्पर्धा परिक्षेचा कसून अभ्यास केला. त्यामुळेच सहाव्यांदा तिने अतिशय उल्लेखनीय यश मिळवले आहे. सध्या त्याची चर्चा सुरू आहे. प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे.
हरियाणातील रेवाडीची महिला उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून भविष्यात प्रगती करू शकतात, हे सिद्ध करून दाखवले आहे. लग्नानंतर नोकरी करतानाच UPSC ची तयारी केली. जवळपास 5 वेळा अपयश येऊनही हार मानली नाही. अखेर मेहनतीने घवघवीत यश संपादन केले आहे. सन 2014 पासून त्यांची ही शर्यत सुरू होती. 2020 मध्ये तीची या परीक्षेची मुलाखत चुकली, पण 2021 मध्ये तिने आपले ध्येय गाठले.
यूपीएससीच्या निकालात तो 345 वा आला असून, त्यानंतर सासर आणि माहेरच्या परिसरात आनंदाची लहर उसळली आहे. शहरातील सेक्टर 3 मध्ये राहणारे जोगेंद्र सिंग यादव, हे शिक्षण विभागातून निवृत्त रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि हरियाणा स्कूल लेक्चरर्स असोसिएशनचे माजी जिल्हा प्रमुख आहेत, उषा यादव यांची सून आहे. UPSC परीक्षेत यश मिळवून त्यांनी जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल केले आहे.
विशेष म्हणजे उषा ही महेंद्रगड जिल्ह्यातील भाकरी गावची मुलगी आहे. एका साध्या कुटुंबातील उषाची आई सुमित्रा देवी अंगणवाडी सेविका आहे तर तिचे वडील, इन्स्पेक्टर नरेंद्र सिंह यादव हे वर्षभरापूर्वी बीएसएफमधून निवृत्त झाले आहेत. उषाचे दोन भाऊ परमजीत यादव आणि योगेश यादव हे देखील यूपीएससीची तयारी करत आहेत. हा निकाल लागल्यानंतर त्यांच्या सेक्टर-3 च्या निवासस्थानी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यादव कुटुंब हे सर्वांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त करत आहेत.
उषा यादव यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, सासू, पती, तीन वर्षांचा मुलगा, कुटुंबातील सदस्य आणि शिक्षकांना दिले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ती नक्कीच आयएएस किंवा आयपीएस होईल, असा तिला विश्वास आहे. उषा म्हणाल्या की, मी आयएएस झाली तर तिचे मुख्य लक्ष शिक्षण, पर्यावरण आणि शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यावर असेल. यूपीएससी परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या उषा यादव यांनी मिळवलेले यश महिलांसाठी प्रेरणादायक आहे.
उषा यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्यासोबतच नोकरीही केली. तसेच त्यांनी त्यांच्या एका महिन्याच्या मुलालाही काही काळ दूर ठेवून तयारी केली. महेंद्रगड जिल्ह्यातील भाखरी गावच्या असून, त्यांचं लग्न रेवाडी येथील सेक्टर 3 येथील रवी यादव यांच्याशी 2016 मध्ये झाले असून साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघांनी एनआयटी मुरथलमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केतो आणि त्यानंतर दोघांनाही नोकरी मिळाली. सध्या उषा यादव या सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. नोकरी करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आहे.