जळगाव – भुसावळ येथील शिवराज मधुकर वाणी हा तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशामध्ये ४३२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. शिवराज याने मुंबईत बीटेकचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो बँकेत ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. शिवराजचे वडील एम. के. वाणी हे माध्यमिक शिक्षक तर आई सौ. सुनंदा मधुकर वाणी या भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी.) मध्ये कार्यरत आहेत. शिवराज हा अतिशय हुशार आहे. सुरुवातीपासूनच त्याने स्पर्धा परीक्षांचे ध्येय ठेवले. त्यामुळेच नियोजनबद्ध अभ्यासावर भर दिला. योग्य मार्गदर्शन आणि अथक परीश्रमाच्या जोरावर त्याने हे यश मिळविले आहे.