नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सर्वसामान्य माणसांना एका गोष्टीचं कामय कुतुहल असतं आणि ते म्हणजे मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या पगाराचं. एखादा आयएएस अधिकाऱ्याला महिन्याला किती वेतन मिळत असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता कायमच लागलेली असते. अर्थात हे वेतन ऐकल्यावर आश्चर्य वाटणार असलं तरीही तेथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, हेही तेवढेच खरे आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला महिन्याला किमान ५६ हजार १०० रुपये मूळ वेतन मिळतं. याशिवाय टीए-डीए आणि एचआरएसह इतरही भत्ते मिळतात. त्यामुळे महिन्याला एक लाखाहून अधिक पगार अधिकाऱ्याच्या खात्यात पडतो. याशिवाय मूळ वेतनाच्या व्यतिरिक्त डिअरनेस अलाऊन्स (डीए), हाऊस रेंट अलाऊन्स (एचआरए), सब्जिडाईज्ड बील, आरोग्य भत्ता, कन्वेंल अलाऊन्सही अधिकाऱ्यावा मिळतो. सोबतच आयएएस अधिकाऱ्याला घर, सुरक्षा रक्षक, खानसामा आणि इतर कर्मचारी या सुविधा देखील सरकारकडून मिळत असतात.
एवढेच नाही तर बदली झाल्यास शिफ्टींग आणि ट्रॅव्हलिंगचा खर्चही सरकारच देत असेत. जिल्हाधिकारी किंवा अन्य एखाद्या पदावर नियुक्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्याला हे वेतन आणि या सुविधा मिळत असतात. तर कॅबिनेट सचिव या पदासाठी महिन्याला जवळपाच अडिच लाख रुपये वेतन आणि इतर भत्ते दिले जातात.
आव्हान छोटे नाही
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे आणि नियुक्ती प्राप्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. गलेलठ्ठ पगार दिसत असला तरीही त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा फार जिद्दीनं पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच भारतातील शासकीय सेवेत नोकरी करण्याची संधी मिळत असते. आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये, शासकीय विभागांमध्ये होत असते. या अधिकाऱ्यांसाठी कॅबिनेट सचिव हे सर्वांत मोठे पद मानले जाते.
आयएएस अधिकाऱ्यांचे वेतन असे
एसडीएम, अंडर सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी – ५६ हजार १०० रुपये
एडीएम, डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी – ६७ हजार ७०० रुपये
डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जॉईंट सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी – ७८ हजार ८०० रुपये
डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डेप्युटी सेक्रेटरी, डायरेक्टर – १ लाख १८ हजार ५०० रुपये
डिव्हिजनल कमीशनर, सेक्रेटरी कम कमीशनर, जॉईंट सेक्रेटरी – १ लाख ४४ हजार २०० रुपये
डिव्हिजनल कमीशनर, प्रिन्सीपल सेक्रेटरी, अॅडिशनल सेक्रेटरी – १ लाख ८२ हजार २०० रुपये
अॅडिशनल चीफ सेक्रेटरी – २ लाख ५ हजार ४०० रुपये
चीफ सेक्रेटरी आणि सेक्रेटरी – २ लाख २५ हजार रुपये
कॅबिनेट सेक्रेटरी – २ लाख ५० हजार रुपये
UPSC IAS Officer Salary Benefits Detail info