इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (युपीएससी) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, त्यामध्ये दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. यूपीएसची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे बहुतेक तरुणांचे स्वप्न असते. तसेच हे ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक इच्छुक मेहनत घेतात. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर जेव्हा ते परीक्षेचा पहिला टप्पा पार करतात, तेव्हा एकीकडे आनंद असतो, तर दुसरीकडे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे दडपण असते.
त्यातच जेव्हा एखादी महिला कठोर संघर्ष, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करतेच, शिवाय टॉपर लिस्टमध्येही सामील होते, तेव्हा यापेक्षा मोठी गोष्ट क्वचितच असू शकते. तसेच ही महिला केवळ मुलींसाठीच नाही तर प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहे. ही यशकथा आहे, हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी हीची. त्यामुळे आयएएस अनु कुमारी यांचा संघर्ष ते यशापर्यंतचा प्रवास जाणून घेऊ या…
अनु कुमारी यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1986 रोजी हरियाणातील सोनीपत येथे हिंदू जाट कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बलजीत सिंग आणि आईचे नाव संट्रो देवी आहे. अनु कुमारीला एक लहान बहीण आणि दोन भाऊ देखील आहेत. अनु कुमारी यांनी तिचे प्रारंभिक शिक्षण शिव शिक्षा सदन, सोनीपत येथून पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत आली. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून भौतिकशास्त्रात बीएससी ऑनर्स पदवी घेतली आहे. नंतर आयएमटी नागपूरमधून एमबीए केले.
मूळच्या हरियाणाच्या असलेल्या अनु कुमारीने सन 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSC ची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. अनु कुमारीने यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर अनु कुमारी केरळ कॅडरमध्ये तैनात होत्या. अनुने मुंबईत ICICI जॉईन केले. त्यांनी सुमारे 9 वर्षे काम केले. 2012 मध्ये अनुचे लग्न वरुण दहियासोबत झाले, जो एक बिझनेसमन होता. लग्नानंतर अनु कुमारी गुरुग्राममध्ये राहू लागली.
सन 2016 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. 10 वर्षांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा विचार केला आणि परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्या शालेय-कॉलेजच्या दिवसांत, अनुच्या मित्रांनी तिला नागरी सेवा परीक्षेत बसण्याचा सल्ला दिला. पण त्या दिवसांत अनुच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर परीक्षेची तयारी सुरू केली. सन 2016 मध्ये अनुने पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांचा फॉर्म मोठ्या भावाने त्याला न सांगता भरला. परंतु त्या दिवसांत अनु कुमारीचे मूल फक्त चार वर्षांचे होते. मुलाला सांभाळताना परीक्षेची तयारी करणे खूपच अवघड होते. मात्र तयारीसाठी ती जवळपास दोन वर्षे मुलापासून दूर राहिली. अनुने मुलाला तिच्या आईकडे पाठवले आणि मन लावून अभ्यास करू लागली. 2017 मध्ये तिच्या दुसऱ्या प्रयत्नात, अनु कुमारीने नागरी सेवा परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला.