शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यूपीएससी निकालाबाबत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांची जाहिरात….या संस्थेला ३ लाखाचा दंड

by India Darpan
ऑगस्ट 18, 2024 | 7:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
upsc

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीराम आयएएस प्रशिक्षण संस्थेने यूपीएससी २०२२ च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) संस्थेवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रचार तसेच ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाणार नाही या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित प्रकरणात ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्याने सीसीपीएच्या अध्यक्ष तथा मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांनी श्रीरामच्या आयएएस विरुद्ध आदेश जारी केला आहे.

प्रशासकीय सेवा संदर्भातील प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि ऑनलाइन शिक्षण-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स हे यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती न देता त्यांची छायाचित्रे आणि नावे इतर संभाव्य उमेदवारांना (ग्राहकांना) प्रभावित करण्यासाठी वापरतात, असे आढळून आले आहे.

श्रीराम आयएएस संस्थेने आपल्या जाहिरातीत पुढीलप्रमाणे दावे केले होते.
i) “यूपीएससी २०२२ परीक्षेत संस्थेच्या २०० हून अधिक उमेदवारांची निवड.”
ii) “आम्ही भारतातील प्रथम क्रमांकाची प्रतिष्ठित यूपीएससी प्रशिक्षण संस्था आहोत.”

सीसीपीएला असे आढळून आले की श्रीराम आयएएस संस्थेने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात तर केली, मात्र यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती जाहिरातीत जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आली होती. यामुळे संस्थेतर्फे दावा करण्यात आलेल्या सर्व यशस्वी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळावर जाहिरात केलेल्या सशुल्क अभ्यासक्रमांची निवड केली होती, या असत्य बाबीवर ग्राहकांचा विश्वास बसला.

ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम – 2(28) (iv) मध्ये महत्वाची माहिती जाणूनबुजून दडवून ठेवण्यासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात तरतूद आहे. यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती ग्राहकांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, ज्याच्या मदतीने स्वतःच्या निवडीचा अभ्यासक्रम आणि कोणत्या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश करायचा याबाबत ते माहितीपूर्ण विवेचन करू शकतील.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये २०० हून अधिक उमेदवारांच्या निवडींच्या दाव्याच्या विरोधात उत्तर देताना श्रीराम आयएएस संस्थेने आपल्या बाजून अवघ्या १७१ यशस्वी उमेदवारांचा तपशील सादर केला. या १७१ उमेदवारांपैकी १०२ उमेदवार हे विनामूल्य मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम (IGP), तर ५५ उमेदवार हे विनामूल्य चाचणी शृंखलेतील होते, याशिवाय ९ उमेदवार सामान्य अभ्यासक्रम प्रशिक्षणातून सहभागी झालेले होते, तर ५ उमेदवार हे राज्य सरकार आणि संस्था यांच्यात विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत विविध राज्यांतील होते. त्यांच्या जाहिरातीत ही वस्तुस्थिती उघड करण्यात आली नाही, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली.

नागरी सेवा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी (PT) अशा पद्धतीने परीक्षेचे सर्व ३ टप्पे पार करावे लागतात ही सर्वज्ञात वस्तुस्थिती आहे. पूर्व परीक्षा ही प्रारंभिक चाचणी असून, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी या दोन्हींमध्ये मिळालेले गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी साठी एकूण गुण अनुक्रमे 1750 आणि 275 आहेत.

अशा प्रकारे एकूण गुणांमध्ये व्यक्तिमत्व चाचणीचे योगदान १३.५ टक्के आहे. श्रीराम आयएएस संस्थेकडून कोणतेही योगदानात्मक सहाय्य न घेता बहुतांश उमेदवारांनी आधीच प्राथमिक आणि मुख्य परीक्षा हे टप्पे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर उत्तीर्ण केले होते. श्रीराम आयएएसने अशाच यशस्वी उमेदवारांना मार्गदर्शन केले होते ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती ही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवून, उमेदवारांना हे कळू न देता अशा फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी असलेल्या ग्राहकांवर मोठा प्रभाव निर्माण करतात. अशाप्रकारे, या जाहिरातीने अनुचित व्यापार प्रथा राबवत ग्राहकांचे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या माहिती प्राप्त करून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे.

जाहिरातीमध्ये महत्त्वाची माहिती सुस्पष्ट, उघड आणि ग्राहकांची दिशाभूल करणे अत्यंत अवघड ठरेल अशा प्रकारे जाहीर करून वस्तुस्थितीचे सत्य आणि प्रामाणिक प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे यावर सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी भर दिला. ग्राहक हक्कांचे महत्त्व आणि ग्राहकांना अचूक माहिती पुरविण्याची जाहिरातदारांची जबाबदारी त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवीन कसारा घाटात दुधाचा टँकर दरीत कोसळला…५ ठार तर ४ जण जखमी

Next Post

लाडकी बहिण योजनेची १५०० रुपयाची रक्कम टप्या-टप्याने तीन हजार रुपयांपर्यंत करणार…मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post
GVRMBFnbkAAekCa

लाडकी बहिण योजनेची १५०० रुपयाची रक्कम टप्या-टप्याने तीन हजार रुपयांपर्यंत करणार…मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011