नाशिक –खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार महिन्यांपूर्वी देशातील चार शहरांमध्ये यूपीएससी सेंटर मंजूर करण्यात आले असून त्यात नाशिकचा समावेश आहे.यूपीएससी सेंटर मंजूर झाल्यानंतर नाशिक येथे प्रथमच आज विद्यार्थ्यांची परीक्षा होत असल्याने खासदार गोडसे यांनी परीक्षा केंद्रावर जात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी खासदार गोडसे स्वतः परीक्षा केंद्रावर आलेले पाहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.खासदार गोडसे यांच्या या अभिनव उपक्रमामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक येथे परीक्षा केंद्र नसल्याने नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर ,नंदुरबार येथील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद या ठिकाणच्या सेंटरवर जावे लागत असे. यामुळे पैसा आणि वेळेचा मोठा अपव्यय होत असे. यातून विद्यार्थ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी नाशिक येथे आरोगाचे परीक्षा सेंटर व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते .दरम्यानच्या काळात खासदार गोडसे यांनी यूपीएससीचे तत्कालीन चेअरमन डेव्हिड आणि विद्यमान चेअरमन जोशी यांची अनेकदा भेट घेत नाशिकला यूपीएससी सेंटर होणे कामी पाठपुरावा केला होता.
खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेवून आयोगाने चार महिन्यापुर्वी नाशिक येथे सेंटर मंजूर केले होते. यूपीएससी सेंटर सुरू झाल्याची घोषणा केल्यानंतर आज प्रथमच नाशिक येथे प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या.नाशिक येथे प्रत्यक्ष केंद्र सुरू झाल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी केटीएचएम कॉलेज,डी डी बिटको कॉलेज आदी परीक्षा केंद्रांवर जाऊन गुलाब पुष्प देत परीक्षार्थींच्या स्वागत केले .स्वतः खासदार यांनी परीक्षा केंद्रावर येत स्वागत आणि शुभेच्छा दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील दहा परीक्षा केंद्रांवर आज साडे तिन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.