नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) सार्वजनिक सेवा प्राथमिक परीक्षा २०२१ आणि भारतीय वनसेवा परीक्षा २०२१ ची संयुक्तिक अधिसूचना बुधवारी (१० फेब्रुवारी) काढणार आहे.
आयोगातर्फे जाहीर झालेल्या २०२१ च्या परीक्षेच्या कार्यक्रमानुसार, यूपीएससी प्रिलियम्स २०२१ ची अधिसूचना आयोगाचे संकेतस्थळ upsc.gov.in यावर जाहीर होणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे. अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी यूपीएससीच्या अॅप्लीकेशन पोर्टल upsconline.nic.in वर २ मार्च २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. यूपीएससी प्रिलियम्स २७ जूनला घेण्याचे प्रस्तावित आहे.
अर्ज कोण करू शकणार?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंना इतर उच्च शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण झालेले पदवीधर उमेदवार यूपीएससी प्रिलियम्स २०२१ अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज करू शकतील. परीक्षेसाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय २१ ते ३२ वर्षाच्या आत असायला हवे. उमेदवाराचं वय कट ऑफ डेटची घोषणा अधिसूचनेदरम्यान करण्यात येईल.