मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) इंजिनियरिंग सर्व्हिसेस परीक्षा २०२० साठी इंटर्व्ह्यू-पर्सनालिटी टेस्टचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी UPSC ESE मुख्य परीक्षेत यश प्राप्त केले आहे ते upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मुलाखतीचे शेड्युल तपासू शकतात. उमेदवारांच्या रोल नंबरप्रमाणे मुलाखतीचे शेड्युल तयार करण्यात आले आहे.
संकेतस्थळावरील शेड्यूलनुसार, सिव्हिल इंजिनियरिंग शाखेसाठी ८ ते ३० मार्च २०२१ पर्यंत मुलाखती होतील. मेकॅनिकलसाठी १५ ते २६ मार्च, इलेक्ट्रीक इंजिनियरिंगसाठी ८ ते ३० मार्च या कालावधीत मुलाखती होतील. तर टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगसाठी ८ ते २४ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या मुलाखती दोन शिफ्टमध्ये होतील. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ पासून आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी १ पासून मुलाखती होतील. मुलाखतीची तारीख आणि वेळा संकेतस्थळावर दिल्या आहेत. पण त्याचवेळी युपूएससीने मुलाखतींसाठी कॉल लेटर जारी केलेले नाही, हेही महत्त्वाचे. त्यामुळे युपीएससीच्या संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर लॉगइन करावे आणि व्हॉट्स न्यू सेक्शनमध्ये संबंधित परीक्षेच्या इंटर्व्ह्यू शेड्यूलवर क्लिक करावे. एक नवे टॅब उघडेल आणि त्यात रोलनंबर व शाखेनुसार संपूर्ण माहिती मिळेल.