नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन व्यवहारात मोठा वाटा असलेल्या युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस)चे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात अडचणी येत आहेत. परिणामी ग्राहक प्रचंड वैतागले आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी सोशल मिडियात युपीआयला ट्रोल केले आहे.
नोटबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना चालना दिली जात आहे. याच अंतर्गत युपीआयचा जन्म झाला आहे. नजिकच्या काळात तर ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारांची प्रचंड सवय झाली आहे. त्यामुळेच अवघ्या १० रुपयांची खरेदीवेळी सुद्धा ग्राहक ऑनलाईन पैसे देत असतात. त्यातच आज दुपारपासून युपीआयचे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे गुगल पे, फोन पे, भीम द्वारे पैसे ऑनलाईन देणाऱ्या ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्य करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने दिलगिरी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/NPCI_NPCI/status/1480144549158653954?s=20
ग्राहकांनी त्यांचा मनस्ताप सोशल मिडियाद्वारे व्यक्त केला आहे. काहींनी ट्विट, काहींनी फेसबुक, काहींनी इन्स्टाग्राम तर काहींनी व्हॉटसअॅपद्वारे युपीआयला लक्ष केले आहे.