मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी नोटाबंदी जाहीर केली आणि या नोटा बंदी मुळे त्याचे केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात परिणाम जाणवले. यानंतर ऑनलाईन व्यवहार वाढले असले तरी चलनातील नोटा मात्र कमी होण्याऐवजी वाढलेल्या दिसून येत आहेत.
नोटाबंदीच्या पाच वर्षांनंतर, डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होऊनही, चलनात असलेल्या नोटांची संख्याही सातत्याने वाढत आहे. मात्र, वाढीचा वेग मंदावला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, डेबिट – क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या माध्यमांद्वारे डिजिटल पेमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे.
वास्तविक, कोविड-19 महामारीच्या काळात नागरिकांना सावधगिरी म्हणून रोख रक्कम ठेवणे चांगले वाटले. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात चलनात असलेल्या नोटा वाढल्या. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे UPI हे देशातील पेमेंटचे प्रमुख माध्यम म्हणून वेगाने उदयास येत आले आहे .
हे आहेत तोटे
आपण गुगल पे, पेटीएम, फोन पे, यूपीआय या सारखे पेमेंट अॅप्स वापरत असाल तर काळजी घ्यावी, कारण हे जितके आपल्या व्यवहाराची पद्धत सुलभ करते तितकेच त्याचे काही तोटे देखील आहेत, त्यामुळे ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. UPI बँक खातेधारकांना (UPI मध्ये सहभागी झालेल्या बँकांच्या) अतिरिक्त बँक माहितीची गरज न पडता, व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA), एक युनिक आयडी वापरून पैसे पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास सक्षम करते.
सुरक्षा उपाय
फसवणूक करणारे फोन कॉलवर किंवा चॅटद्वारे व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) विचारतात. त्यामुळे अशा अॅप्सचा वापर करताना सायबर फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी UPI पेमेंट सुरक्षा उपायांबद्दल जागरूक असले पाहिजे. काही सोप्या स्टेप (पायऱ्या ) असून यामध्ये संबंधित बनावट लिंकवर क्लिक न करणे, फसवणूक कॉलला उत्तर देणे, आवश्यक व्यवहार तपशील जसे की पिन नंबर, पासवर्ड आदि प्रदान करणे समाविष्ट आहे.
पिन नंबर
कोणालाही तुमचा पिन कधीही शेअर करू नका. मित्र असो, कौटुंबिक सदस्य असो, तुमचा प्रचंड विश्वास असलेली एखादी व्यक्ती असो, कोणाशीही पिन शेअर केल्याने तुमची फसवणूक होऊ शकते.
हस्तांतरण विनंती
भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM), Google Pay, PhonePe इत्यादी UPI अॅप्सवर पैसे पाठवण्याची विनंती करून फसवणूक करणारे भामटे तुमची फसवणूक करू शकतात. तसेच फसवणूक करणारे यूपीआय अॅप्सच्या ‘रिक्वेस्ट मनी’ पर्यायाचा वापर करून उत्पादनाच्या विक्रेत्याला पैसे हस्तांतरित करण्यास सांगतात. गेल्या काही महिन्यांत अशा फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
पासवर्ड
तुमचा फोन आणि तुमची पेमेंट अॅप्स चांगला पासवर्डने लॉक करा. सहसा बहुतेक लोक तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी साधे पासवर्ड वापरतात. ते टाळले पाहिजे. तुमचा पासवर्ड मजबूत करण्यासाठी, अक्षरे, संख्या आणि अक्षरे समाविष्ट करा. तसेच UPI अॅप नियमितपणे अपडेट करा. त्याचप्रमाणे नेहमी UPI पेमेंट अॅप नवीनतम एडीशनवर अपडेट केले पाहिजे.