नवी दिल्ली – केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन चेच सध्या देशभरात लसीकरण सुरू आहे. मात्र, देशात आणखी ७ लसींवर सध्या मोठ्या गतीने काम सुरू आहे. या लस लवकरच मंजुरी मिळून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. बघूया कोणत्या आहेत या लस आणि त्या केव्हा उपलब्ध होतील….
१. कोविशिल्ड
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफोर्ड विद्यापीठाची कोविशिल्ड आणि अॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीने ही लस तयार केली आहे. भारतात आणीबाणीच्या वापरास या लसीला मान्यता देण्यात आली आहे.
२. कोव्हॅक्सिन
हैद्राबादस्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या सहकार्याने ही कोरोना लस तयार केली गेली आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास भारतात मान्यता देण्यात आली आहे.
३. स्पुटनिक-व्ही
रशियाच्या गेमलय नॅशनल सेंटरद्वारे ही लस विकसित केली जात आहे. तिसरा टप्प्याची चाचणी व स्पुटनिक-पाच लस उत्पादन हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅब करत आहे. येत्या जूनपर्यंत ही लस बाजारात येण्याची चिन्हे आहेत.
४. झायकोव्ह-डी
कॅडिला हेल्थकेअरची ही लस डीएनए प्लॅटफॉर्मवर बनविली जात आहे. त्याचे नाव झायकोव्ह-डी आहे. कॅडिलाने यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभागाशी सहकार्य केले आहे. तिसरा टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्या झाल्या आहेत. ही लस ऑगस्ट पर्यंत येण्याची चिन्हे आहेत.
५. नोवावॅक्स
देशात तयार केलेल्या लसीचे नाव आहे एनव्हीएक्स-कोव्ह २३७३ (नोवावॅक्स). ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली असून त्यासाठी संस्थेने अमेरिकन कंपनी नोवावैक्सबरोबर भागीदारी केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्या झाल्या आहेत. ही लस सप्टेंबर पर्यंत येण्याची चिन्हे आहेत.
याशिवाय खालील लसींच्या चाचण्याही सध्या सुरू आहेत
१. बायोलॉजिकल ई लिमिटेड लस
अमेरिकन-आधारित एमआयटी-निर्मित प्रोटीन अँटीजेन बेस्ड लस हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमिटेडद्वारे तयार केली जात आहे. त्याच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू आहेत.
२. एचजीसीओ -१
पुणे येथील जिनोवा कंपनी अमेरिकेच्या एचडीटी कंपनीच्या लस तयार करीत आहे. एचजीसीओ -१ असे या लसीचे नाव आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या लवकरच सुरू होतील.
३. इंडिया बायोटेकची दुसरी लस
अमेरिकेच्या थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या सहकार्याने हैदराबाद येथील भारत बायोलॉजिकल ई लिमिटेड ही कंपनी कोरोना लस विकसित करीत आहे. ही लस सध्या प्रयोगशाळेच्या स्तरावर आहे. क्लिनिकल चाचणी अद्याप सुरू झालेली नाही.
४. ऑरोबिंडो फॉर्मिया लस
भारताची अरबिंदो फार्मा ही कंपनी अमेरिकन औरोवॅक्सिनच्या सहकार्याने ही लस विकसित करीत आहे. सध्या ही लस प्राथमिक अवस्थेत आहे.