इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुठलीही शिकवणी न लावता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत पहिल्याच प्रयत्नात पंक्चरवाल्याच्या मुलाने न्यायाधीश बनण्याची किमया साधली आहे.
लहानसहान अडचणींपुढे हार मानून परिस्थितीचा बाऊ करणाऱ्यांची जगात कमी नाही. मात्र, काही असेही असतात जे मोठ्ठाल्या संकटांनासुद्धा न घाबरता पुढे जातात. अहद अहमद हा त्यातलाच एक आहे. अहद काही वर्षांपूर्वीपर्यंत वडिलांसोबत सायकल दुरुस्त करायचे. कधी कधी ते आईला कपडे शिवण्यासाठी मदत करत असे. आज ते न्यायाधीश झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच प्रयत्नात अहद यांनी हे यश मिळवलं, तेही कोणत्याही कोचिंगशिवाय. सेल्फ स्टडी करून त्यांनी हे घवघवीत यश मिळवले. पंक्चरवाल्याच्या मुलाच्या यशाने प्रयागराजमधील लोक खूश झाले आहेत. त्याच्या यशाचा आनंद साजरा केला जात आहे.
अहद आणि त्यांच्या कुटुंबाचे खास अभिनंदन करत आहे. अहद अहमद हा प्रयागराज शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाबगंज भागातील बरई हरख या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. गावात त्यांचे एक छोटेसे मोडकळीस आलेले घर आहे. घराशेजारी वडील शहजाद अहमद यांचे सायकल पंक्चरचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात ते मुलांसाठी टॉफी आणि चिप्सही विकतात. हे दुकान अजूनही चालते. गेल्या काही वर्षांपासून अहद कधी कधी वडिलांच्या कामात मदत करतात. अहदच्या यशालाही महत्त्व आहे कारण सायकल दुरुस्त करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्या वडिलांनी रात्रंदिवस मेहनत करून त्यांना शिकवले.
चित्रपटाने दिली प्रेरणा
आपल्या मुलाला शिक्षित करून यशस्वी व्यक्ती बनवण्याची कल्पना आई अफसाना यांना चित्रपट पाहिल्यानंतर आली. हा चित्रपट पाहिल्यानंतरच आईने ठरवलं की आपल्या पतीच्या पंक्चरच्या दुकानातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आणि त्या महिलांचे कपडे शिवून मुलांना शिकवतील. अहद अहमद हे चार भावंडांमध्ये तिसरे आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी अहद यांचे शिक्षण तर केलेच पण इतर मुलांनाही शिकवले. अहद यांचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. लहान भाऊ एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक आहे.
UP Prayagraj Garageman Son PCS Exam Judge Success Story