इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेम प्रकरणांमध्ये काही संशय निर्माण होऊन अनैतिक घडले तर त्यातून बरेचदा आत्महत्या, हत्या किंवा खूनाचे प्रकारही घडतात, उत्तर प्रदेशात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. लखनौमध्ये मागील महिन्यात तीन प्रेमीयुगुलांनी मिळून प्रशिक्षणार्थी नर्सची हत्या केली होती. या संदर्भातील घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तिघांना अटक
रहिमाबाद येथील रहिवासी १७ वर्षीय प्रशिक्षणार्थी नर्स एका खासगी रुग्णालयात काम करत होती. ही प्रशिक्षणार्थी नर्स दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी या नर्सचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ पडलेला आढळून आला. पोलिसांनी डॉक्टरसह तीन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. पोलिस तपासात तिन्ही आरोपींसोबत नर्सशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिघांनाही एकत्र येत तिची हत्या केली.
हत्येचा कट
तपासादरम्यान असे समोर आले की, प्रशिक्षणार्थी नर्सचे अमित अवस्थी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. यासोबतच या नर्सचे हॉस्पिटलमधील डॉ. अंकित सिंग आणि अमितचा मित्र दिनेश मौर्य यांच्या संपर्कात होती. तो तिघांशीही फोनवर प्रेमाच्या गोष्टी बोलत असे, घटनेच्या सुमारे दोन महिन्यांपूर्वी या तिघांनाही याची माहिती मिळाली. त्यानंतर अमित, अंकित आणि दिनेश यांनी मिळून प्रशिक्षणार्थी नर्सच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर एप्रिल रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास अमितने मुलीशी संपर्क साधून तिला आपल्या बागेत नेले, आणि येथेच त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.
मृतदेह फेकला
यानंतर मृतदेह ट्रॅकच्या बाजूला फेकण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह गोसवा गावच्या रेल्वे गेटजवळ ट्रॅकच्या बाजूला पडलेला आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता त्यांना आढळून आले की, दि. ९ एप्रिलच्या रात्री प्रशिक्षणार्थी नर्स आरोपी अंकितच्या फ्लॅटवर थांबली होती. इथे आणखी दोन जण हजर होते. दुसऱ्या दिवशी अमितने तिच्याशी संपर्क साधून बोलवून घेतले होते.
असा सुरू झाला तपास
पोलिसांनी आरोपींच्या मोबाइलची झडती घेतली असता त्यात काही कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅट सापडले. पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी आणले. गंभीर चौकशी न करता त्यांना सोडून दिले. तेव्हा पोलीस सुध्दा ही आत्महत्या असल्याचा युक्तिवाद करत होते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धारेवर धरल्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू करत पुरावे गोळा करून आरोपींंना अटक केली.
पोलिस ठाण्यात गोंधळ
मुलाला अटक झाल्यामुळे मुख्य आरोपी अमित अवस्थी याच्या आई व काही नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. आरोपीची आई कल्पना यांनी आरोप केला की, पोलिसांनी ३ लाख रुपये घेऊन आपल्या मुलाला या प्रकरणात गोवले आहे. आमच्या आईने स्वतःच्या बांगड्या तोडल्या आणि नस कापण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी आता तिघांना शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
UP Nurse Affair doctor Police Investigation