इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आपल्या प्रेमासाठी आलेली सीमा हैदर ही महिला सध्या जोरदार चर्चेत आहे. आज तर तिने कमालच केली आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने रबूपुरा येथील घरावर तिरंगा फडकावला. यावेळी तिचे पती सचिन आणि अधिवक्ता एपी सिंह देखील उपस्थित होते. यासोबतच सीमाने पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. सीमा हैदरचा हा नवीन व्हिडिओ सध्या सोशल मिडियात तुफान व्हायरल झाला आहे.
सीमाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून भारत माता की जय आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पाकिस्तानातील कराची येथील सीमा हैदर ही महिला ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथे राहणाऱ्या सचिनच्या घरी आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय आली आहे. बेकायदेशीरपणे भारतात आल्याने पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात पाठवले होते. सध्या दोघेही जामिनावर बाहेर असून रबुपुरा येथे राहत आहेत. आज तिने जय माता दी या नावाची पट्टीही आपल्या डोक्याला बांधली. आपल्या मुलांसमवेत तिने हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
सीमा हैदर सतत बातम्यांमध्ये असल्यामुळे सचिनच्या कुटुंबाला कामावर जाता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी ही अडचण पाहून मेरठचे रहिवासी निर्माता अमित जानी यांनी मदतीची ऑफर दिली. आणि सीमा हैदरला त्यांच्या एका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनच्या राबुपुरा येथील घरी एक अनोळखी पत्र आले. त्यात गुजरातमधील एका उद्योगपतीने सीमा व सचिन यांना नोकरीची ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये सीमा आणि सचिनला दरमहा ५०-५० हजारांची नोकरी देऊ करण्यात आली आहे. सीमा-सचिनच्या घरी पोहोचलेल्या या पत्रात हे दोघेही कोणत्याही दिवशी येऊन नोकरीवर रुजू होऊ शकतात, असे लिहिले होते. यासोबतच उद्योगपतींनी अन्य मदतही देऊ केली आहे. सीमा हैदर आणि सचिनला मिळालेल्या या ऑफरनंतर दोघांचे नशीब उजळल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
UP Noida Seema Haider Slogan Tricolor Hindustan Pakistan
Video Viral