इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानातून बेकायदेशीररित्या भारतात दाखल झालेली सीमा हैदर हिने आतापर्यंत प्रेमासाठी भारतात आल्याची माळ जपली. आणि आता तर ती आपल्या प्रेमासाठी थेट लाईव्ह शोमध्ये भांडायला लागली आहे. एका वाहिनीवर तिने मांडलेला उच्छाद सध्या चांगलाच चर्चेत आहे.
मेरा पती सिर्फ मेरा है… असा नारा देणाऱ्या सीमा हैदरला तिचा नवरा सचिन याच्याबद्दल एकही शब्द वाईट बोललेले आवडत नाही. आपण पाकिस्तानातून केवळ त्याच्यासाठी मुलांना घेऊन भारतात दाखल झालोय, असे तिने वारंवार सांगितले आहे. पाकिस्तानात तिच्या नवऱ्याकडून होणारा अन्याय सहन होत नव्हता आणि त्याच काळात सचिनची तिची ओळख सोशल मिडियावर झाली. त्यामुळे तिला नवऱ्याच्या जाचातून सुटका करून घेण्याचा मार्ग सापडला. पण त्यासाठी तिने बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला.
सीमा हैदर आणि सचिन ज्या ठिकाणी राहतात तिथे त्यांचे शेजारी पाजारी त्यांच्याबद्दल बरेच काहीबाही बोलत असतात, याची दोघांनाही जाणीव होती. पण एका महिलेने लाईव्ह शोमध्ये तिच्या नवऱ्याबद्दल काही विशेषणे वापरली आणि तिचा राग अनावर झाला. त्यावरून तिने लाईव्ह शोमध्येच भांडायला सुरुवात केली. एका वाहिनीवर सीमा आणि तिची शेजारीण मिथिलेश यांची मुलाखत सुरू होती. त्यावेळी मिथीलेश हिने ‘लप्पू सा सचिन’ हा शब्दप्रयोग केला. यासोबत तिने सचिनसाठी झिंगूर असाही शब्दप्रयोग केला. त्यावरून सीमाला प्रचंड राग आला आणि माझ्या पतीबद्दल असे शब्द वापरलेले मला मुळीच आवडणार नाही, असे म्हणत तिने मिथिलेश हिच्यासोबत भांडायलाच सुरुवात केली.
आमच्या मुली अशा नाहीत
माझे पती तीन तीन वर्षे देशाच्या बाहेर राहात असतील तर मी दुसरे काय करणे अपेक्षित आहे, असा सवाल सीमा हैदरने केला. त्यावर मिथिलेश यांनी आमचे सैनिक दहा दहा वर्षे देशाचे रक्षण करत असतात, तेव्हा आमच्या देशातील मुली असा मार्ग निवडत नाहीत, असे रोखठोक उत्तर दिले.
कायदेशीर नोटीस
सीमा हैदर हिने मिथिलेश हिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपल्या पतीबद्दल लाईव्ह शोमध्ये अपशब्द वापरल्याचे कारण देऊन सीमाने कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. सीमाचे वकील एपी सिंह यांनी यासंदर्भात मिथिलेश हिला नोटीस बजावली आहे.
UP Noida Pakistani Seema Haider Neighbour Scuffle