इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये जैन समाजाच्या भगवान आदिनााथांच्या निर्वाण लाडू महोत्सवा दरम्यान ६५ फुट स्टेज कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला तर ८० हून अधिक जण जखमी आहे. बागपत शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या बरौत तहसीलमध्ये सकाळी ७ ते ८ दरम्यान ही घटना घडली. उत्सवात भगवान आदिनाथांचा प्रसाद अर्पण कार्यक्रम सुरु होता.
या घटनेनंतर पोलिस व रुग्णवाहिनी तातडीने दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. या दुर्घटनेत १५ पोलिस देखील जखमी झाले. या उत्सवात भगवान आदिनाथांचा प्रसाद कार्यक्रम सुरु होता. उत्सवासाठी ६५ फूट उंच लाकडी स्टेज बांधण्यात आला. त्यावर ४-५ फूट उंच मूर्ती ठेवण्यात आली होती. भक्त भगवानापर्यंत पोहण्यासाठी मचाणासारख्या पाय-या चढत होते. वाढत्या वजनामुळे संपूर्ण मचान खाली पडला.
या घटनेनंतर बागपतचे जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांनी सांगितले की, बरौत येथे जैन समाजाचा एक कार्यक्रम होता. एक लाकडी स्टेज बांधण्यात आला होता. त्यावेळी स्टेज अचानक कोसळला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली.