इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नातेसंबंधांना काळीमा फासणाऱ्या घटना सतत घडत असतानाच वडिलांनी पत्नीवर बलात्कार केला असल्याने तिला आई मानत पतीने घराबाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंध खराब करणाऱ्या घटनांनी समाज ग्रस्त आहे. नातेसंबंधांची कुठलीही मर्यादा न पाळता दुष्कृत्य करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशात मुजफ्फरनगर जिल्ह्यातील या घटनेने कळस गाठला आहे. वडिलांनी पत्नीवर बळजबरी केली असता पतीला आई मानणाऱ्या व्यक्तीचा निषेध करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडितेच्या ५० वर्षीय सासऱ्याने, कथितपणे घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि या प्रकरणाविषयी तक्रार केल्यास किंवा कोणाकडे तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.
७ सप्टेंबरला पोलिसात तक्रार करत महिलेने म्हटले होते की, “मी माझ्या पतीला मारहाणीची माहिती दिली तेव्हा त्याने मला सांगितले की त्याच्या वडिलांनी माझ्याशी संबंध प्रस्थापित केले असल्याने, आता मी त्याच्या वडिलांची पत्नी बनले आहे म्हणून आम्ही एकत्र राहू शकत नाही”. यानंतर पतीने मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोप तिने केला आहे. पीडितेने सांगितले की, “मला माझा मान जपायचा होता म्हणून मी गप्प राहिले पण वारंवार विनंती करूनही, माझ्या पतीने माझी कोणतीही चूक नसताना मला परत घरी घेण्यास नकार दिला. म्हणूनच मी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.”
गुन्हा दाखल, तपास सुरू
दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती देताना स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) राघवंद्र यादव म्हणाले की, “तिच्या सासऱ्यावर आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) आणि ६०६ (धमकावणे) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पतीवर कलम ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडितेची ओळख तिच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी उघड केलेली नाही. पण सदर प्रकरणात तपास सुरु आहे.
UP Muzaffarnagar Crime Pregnant Women Rape Father in Law
Uttar Pradesh muzaffarnagar