इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात आज मोठी घटना घडली आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथे नेले जात होते. त्यावेळी त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या दोघांचा यात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच माफिया अतिकचा मुलगा आणि शूटर गुलाम यांचे उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने एन्काऊंटर केले आहे. त्यास काही तास उलटत नाही तोच आता माफिया अहमद आणि त्याच्या भावाला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. माफिया अहमद याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल आहेत. सध्या तो तुरुंगात होता. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. त्याचवेळी या दोघांना गोळ्या घालण्यात आल्या.
नेमकं काय घडलं
मीडिया कर्मचार्यांच्या भूमिकेत असलेल्या तीन दुचाकीस्वार तरुणांनी अतिक अहमद आणि अशरफ यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. दोघांनाही समजेपर्यंत गोळी त्यांच्या डोक्यातून गेली. घटनास्थळी एकच खळबळ उडाली. गोळीबारानंतर तरुणांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. गोळीबार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडले. आरोपी तरुणांनी मीडियाची लेसही गळ्यात लटकवून ठेवला होता. अतिकला पहिली तर अशरफला दुसरी गोळी लागली.
धुमणगंज पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद असलेल्या अतिक आणि अश्रफ यांची एटीएसकडून शस्त्र तस्करीसंदर्भात चौकशी करण्यात आली. रात्री १०.३० च्या सुमारास दोघांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेले जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून तीन हल्लेखोर पत्रकार म्हणून आले आणि त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला.
गोळ्या लागल्याने अतिक आणि अशरफ खाली पडले. दोघांनाही तातडीने स्वरूपराणी नेहरू रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. घटनास्थळावरून दोन पिस्तूल आणि सहा काडतुसे सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस सतर्क झाले.
विशेष म्हणजे उमेश पाल अपहरण प्रकरणात एमपीएमएलए कोर्टाने अतिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिक अहमद यांच्यावर १०० हून अधिक खटले प्रलंबित आहेत. आता तो पोलीस कोठडीत असतानाच त्याचा खून झाला आहे.. शेकडो पोलिसांचा ताफा असताना हॉस्पिटलच्या गेटवर दोघांनाही गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे पोलिसांमध्ये चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत धूमगंज येथील कॉन्स्टेबल मानसिंग जखमी झाले. त्याच्या हाताला एक गोळी लागली आहे.
Uttar Pradesh | Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj. pic.twitter.com/8SONlCZIm0
— ANI (@ANI) April 15, 2023
UP Mafia Atiq Ahmed and brother Ashraf Shot Dead