रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संतापजनक… मंदिरातून घरी जाणाऱ्या महिलेवर सामुहिक बलात्कार…

by India Darpan
ऑगस्ट 15, 2023 | 4:18 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशातील असे कोणतेही राज्य आजच्या काळात दिसून येत नाही की, तेथे महिलांवर अत्याचार झाला नाही. अलिकडच्या काळात या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने समाजातील विकृत व नराधामांना आणखी कडक शिक्षा करण्यासाठी आणखी कठोर कायदे करण्याची गरज आहे. सध्याच्या कायद्याचा कोणालाही धाक दिसून येत नाही. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देवदर्शन करुन परतत असताना गाठलं…
एक धार्मिक वृतीची महिला घरापासून दूरवरच्या एका मंदिरात देवदर्शनासाठी गेली होती. देवदर्शन घेऊन ती घरी परत येत असताना तिला वेळ झाला, अंधार पडू लागला होता , रस्ता सुनसान होत होता. सायंकाळच्या सुमारास ही महिला रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहत होती. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शेरू आणि झुबेर अहमद नावाची एक व्यक्ती चारचाकी वाहनातून महिलेजवळ आले. त्यांनी त्या महिलेला सहानुभूती दाखत सांगितले की, आता उशीरा कोणतीही बस मिळणार नाही. त्यामुळे आम्ही कारमधून तुम्हाला घरी सोडतो. काळजी करू नका. काळोख वाढत असल्याने सदर महिला त्यांच्या भुलथापांना बळी पडली. घरी जाण्यासाठी ती आरोपींच्या कारमध्ये बसली. मात्र आरोपींनी पीडितेला तिच्या घराकडे नेण्याऐवजी जंगलात नेले.

तोंडात कापडाचा बोळा कोंबला..
महिलेने विश्वास ठेवला, मात्र त्या दोन नराधमांनी तिचा गैरफायदा घेतला. यावेळी पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा आवाज कुणीही ऐकू नये म्हणून आरोपींनी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. नराधमांनी कार लॉक केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. तसेच घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील नराधमांनी पिडीतेला दिली. याशिवाय एकाने तिच्या डोक्यावर बंदूक लावली आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. तसे पीडितेने तक्रारीत दिले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. या दोघांना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

UP Koshambi Crime Women Gangrape
Uttar Pradesh

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शासकीय रुग्णालयांची अवस्था आणि कारभारावर फडणविसांनी दिली ही प्रतिक्रिया

Next Post

राज्यातील ‘आयटीआय’मध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

Next Post
F3j9avoakAAp3nR

राज्यातील ‘आयटीआय’मध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये...

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011