इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात माफिया अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि शूटर गुलाम यांचा स्पेशल टास्क फोर्सने एन्काऊंटर केला. झाशीच्या बारागाव परिसरात गुरुवारी एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत हे दोघे मारले गेले. आता या एन्काऊंटरची चौकशी होणार आहे. तसे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहर दंडाधिकारी अंकुर श्रीवास्तव यांना तपास अधिकारी करण्यात आले आहे. नगर दंडाधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, या घटनेबाबत कोणाला कोणतीही माहिती किंवा पुरावे द्यायचे असतील तर ते तीन दिवसांत देऊ शकतात.
अतिक अहमदची पोलिस कोठडीतून सुटका करण्यासाठी दोघेही झाशीला पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी एसटीएफवर गोळीबार केला. एसटीएफच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत असद आणि गुलाम ठार झाले.
UP Encounter Enquiry District Magistrate Order