लखनौ – उत्तर प्रदेशच्या भाजप मंत्रीमंडळातून राजीनामा दिलेले मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मौर्य यांच्यासोबत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले धर्म सिंह सैनी, बृजेश प्रजापती, भगवती प्रसाद सागर, मुकेश वर्मा, रोशन लाल वर्मा, विनय शाक्य, अपना दलचे चौधरी अमर सिंह, युसुफ अली, नीरज मौर्य, हरपाल सैनी हे नेते सुध्दा समाजवादीमध्ये दाखल झाले.
समाजवीदात प्रवेश केल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आजचा दिवस भारतीय जनता पक्षाच्या अंताचा इतिहास लिहिणार असल्याचे ते म्हणाले. आज त्यांची झोप उडणार आहे. कुंभकर्णासारख्या झोपणाऱ्या भाजपच्या नेत्यांना, आमदार, खासदार यांच्याशी बोलायला वेळ नव्हता असेही ते म्हणाले. धर्म सिंह सैनी म्हणाले यांनी अखिलेश यादव यांना २०२२ ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तर २०२४ ला ते देशाचे पंतप्रधान असणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती. त्यामुळे भाजपला वाटणारी ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही. गेल्या काही दिवसात भाजपला मोठे हादरे बसले असून काही जण पक्ष सोडून जात असल्यामुळे आता भाजप त्याला कसे उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/samajwadiparty/status/1481899787977109505?s=20