इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते आहे की, एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजर शिवमला खांबाला बांधून त्याला काठीने जबर मारहाण केली जात आहे. ज्यामध्ये शिवमचे हात पाय खांबाला बांधलेले आहेत आणि एक तरुण त्याच्यावर काठीने मारहाण करत आहे. व्हिडीओ ज्या गोदामात आहे त्या गोदामात होजियरीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. शिवमच्या आजूबाजूला डझनभर लोक उभे आहेत.
शिवम मारहाणीमुळे बेशुद्ध होताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवम अर्धमेला होईपर्यंत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याला श्वास घेण्यात अडचणी येत असल्याचे दिसल्यावर शिवमला रुग्णालयात नेले आणि त्याला पडलेल्या अवस्थेत दाखल करून घेऊन तेथून पळ काढला. मंगळवारी रात्री उशिरा कुटुंबीयांना याची माहिती मिळाली आणि ते वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले तेव्हा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. शिवमच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, जे बेदम मारहाणीची साक्ष देत आहेत.
वडील अधिश जोहरी यांनी मुलाचे डोके धरले तेव्हा त्याचे हात रक्ताने माखले होते. डोक्यावर जखमाही होत्या. मृतदेहाची अवस्था पाहून शिवमला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजण्यास त्यांना वेळ लागला नाही. बुधवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने हत्येची पुष्टी केली.
शाहजहांपूरमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर शिवम जोहरी (३२) यांना गोडाऊनमध्ये बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शिवमला गोदामात बांधून काठीने मारहाण केली जात आहे. शिवमच्या वडिलांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात व्यापारी नेते नीरज गुप्ता आणि ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक बंकिम सुरी यांच्यासह सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वाहतूकदारासह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. चौक कोतवाली परिसरातील मोहल्ला अजीजगंज येथे राहणारे अधिश जोहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा शिवम जोहरी हा शाहजहांपूर सूरी ट्रान्सपोर्टमध्ये सात वर्षांपासून व्यवस्थापक होता. मंगळवारी सायंकाळी एका तरुणाने त्याला गंभीर अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्यांनी सांगितले की, सायंकाळी ट्रान्सपोर्ट कंपनीचे कर्मचारी बलराम यांनी शिवमला विजेचा धक्का लागल्याची माहिती दिली. मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिट असल्याचे सांगितले. कुटुंबीयांसह ते तेथे पोहोचले असता मृतदेह शवागारात ठेवलेला आढळून आला. शिवमच्या डोक्यावर तसेच शरीरावर जखमेच्या खुणा होत्या.
मुलाच्या निधनानंतर अधिश जोहरी पूर्णपणे खचले आहेत. मुलगा शिवमच्या पाठिंब्याने ते आपले जीवन जगत होते. त्यांच्या पत्नीचे १९९८ मध्ये निधन झाले आहे. २०१६ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन झाले. शिवम हा त्याचा एकमेव आधार होता. घरात सून आणण्याच्या तयारी सुरू होत्या. अधिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी शिवमला मुलगी पाहण्यासाठी जायचे होते.
वाहतूक कंपनी व्यवस्थापकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस अधिक्षक एस. आनंद यांनी म्हटले आहे. तर, मारहाणीचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. आम्ही किंवा आमचे लोक कोणाशी कशाला भांडणार. विजेचा धक्का लागून शिवमचा मृत्यू झाला, असे व्यापारी नेते नीरज गुप्ता यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/AnilKumarVerma_/status/1646392745689497600?s=20
UP Crime Video Viral Company manager Beaten Murder