मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातेत पळवून नेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने होत असतो. शिवाय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही महाराष्ट्राचं मोठं नुकसान करत असल्याचीही टिका त्यांच्यावर होत असते. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन आपल्या राज्यासाठी पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणुक नेल्यामुळे विरोधकांना मोठा मुद्दा हाती लागलेला आहे.
रिलायन्स, अदानी, टाटा, पिरामल या कंपन्यांनी उत्तर प्रदेशात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत असताना उद्योजकांच्या भेटी घेतल्या. यात रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. योगी यांनी सर्व उद्योजकांना उत्तर प्रदेशातील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समीटमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. या समीटमध्ये जगभरातील अनेक कंपन्यांसोबत करार होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
https://twitter.com/myogiadityanath/status/1611036382465789952?s=20&t=FjZFO_GKgdsnyeeT6qjX5w
मुकेश अंबानी यांनी तर उत्तर प्रदेशात इलेक्ट्रॉनिक्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणुक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संपूर्ण राज्यात ५जी आणि गावावांमध्ये आर्टिफीशीयल इंटलिजन्सच्या आधारावर उत्तम आरोग्य यंत्रणा विकसीत करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही योगी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश तसेही चित्रपट निर्मितीचे मोठे हब राहिलेले आहे. त्यादृष्टीने आणखी काही नव्या योजना पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
https://twitter.com/myogiadityanath/status/1611032727574413312?s=20&t=FjZFO_GKgdsnyeeT6qjX5w
मोठ्या उद्योजकांच्या भेटी
केवळ अंबानीच नव्हे तर टाटा, गोदरेज, बिर्ला, हिंदुजा, लोढा या कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी व प्रमुखांशी योगी यांनी चर्चा केली. अदानी कंपनीने खासगी-सार्वजनिक तत्वावर मेडिकल कॉलेज सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच १० हजार युवकांसाठी नोएडा येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय अदानीने घेतला आहे.
https://twitter.com/myogiadityanath/status/1611018802715852803?s=20&t=FjZFO_GKgdsnyeeT6qjX5w
टाटा सन्सचे पुढचे पाऊल
टाटा सन्सने उत्तरप्रदेशातील सर्व विमानतळांवर एअर इंडियाची सेवा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही मोठं काम करण्याची तयारी त्यांनी केली आहे. आध्यात्मिक सर्किटच्या धरतीवर विकास करण्याचा त्यांचा मानस आहे. यात अध्यात्मिक महत्त्व असलेल्या सर्व ठिकाणी हॉटेल्स सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/myogiadityanath/status/1611016803198857216?s=20&t=FjZFO_GKgdsnyeeT6qjX5w
UP CM Yogi Adityanath Mumbai Visit Successful Investment