इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आता उत्तर प्रदेशात दंगली होत नाहीत. यूपीमध्ये आता कायद्याचे राज्य आहे. आता कोणतेही व्यावसायिक गुन्हेगार आणि माफिया हे कोणत्याही उद्योजकांना धमकावू शकत नाहीत, उत्तर प्रदेश आज तुम्हाला सर्वोत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची हमी देतो.
मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले की, जे माफिया आधी इतरांसमोर संकट निर्माण करायचे, तेच आता संकटात आहेत. यूपीमध्ये आमच्या सरकारमध्ये एकदाही कर्फ्यू लागू करण्यात आलेला नाही. आता कोणत्याही जिल्ह्याच्या नावाची भीती नाही. यूपी आता विकासासाठी ओळखले जाते. यापूर्वी यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती. लोकभवन येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
https://twitter.com/AHindinews/status/1648224612474560512?s=20
UP CM Yogi Adityanath Big Statement on Mafia