इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माणूस किती मोठा झाला किंवा त्यागी झाला तरी त्याला त्याचे मुळ गाव आणि घर हे प्रिय असते, कारण त्याची त्याला ओढ लागलेली असते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तीन दिवसांच्या दौऱ्यावर उत्तराखंडला पोहोचले. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांचा हा पहिलाच उत्तराखंड दौरा आहे.
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पौडी गढवाल येथील यमकेश्वर येथील गुरु गोरखनाथ महाविद्यालय परिसरात त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमात भाषणादरम्यान मुख्यमंत्री योगी आपले आई-वडील आणि गुरु अवैद्यनाथ यांची आठवण करून भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांचा सन्मान केल्याने मला बरे वाटत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सीएम योगी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, आज मला यमकेश्वर, (ता. पौरी- जि. गढवाल, उत्तराखंड) येथील माझ्या शाळेतील शिक्षकांना भेट देण्याचा आणि त्यांचा आदर करण्याचे सौभाग्यही मिळाले. उत्तराखंडच्या दौऱ्यात त्यांच्या मूळ गावी यमकेश्वर येथे पंचूर येथे पोहोचलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घरी पोहोचून आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आईची शेवटची भेट घेतली होती.
बऱ्याच दिवसांनी मुलाला पाहून सीएम योगींच्या आई सावित्रीला खूप आनंद झाला. त्यांनी पुत्र योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. संन्यास घेतल्यानंतर 28 वर्षांनी योगी आदित्यनाथ आपल्या घरी रात्र घालवणार आहेत. योगी यांचा धाकटा भाऊ महेंद्र सिंह बिश्त यांच्या मुलाच्या मुंडण समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे त्यांच्या तीन बहिणी मुख्यमंत्री योगी यांना भेटण्यासाठी घरी पोहोचल्या आहेत, तर त्यांचे तीन भाऊही घरीच आहेत. सीएम योगी यांचे त्यांच्या मूळ गावी पाचूर येथे आगमन झाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गावातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. त्यांच्या घरापासून गावकऱ्यांना शंभर मीटर अंतरावर जाण्याची परवानगी नाही. तसेच यूपी आणि उत्तराखंड पोलिसांनी घरामध्ये बाहेरच्या व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. उत्तराखंड पोलिसांचा चौफेर बंदोबस्त आहे, तर अंतर्गत सुरक्षा एनएसजी कमांडोकडे सोपवण्यात आली आहे.