लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबत माहिती ट्विट करुन दिली आहे. काल त्यांनी कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी कोरोना पॅाझिटिव्ह झाल्यामुळे सेल्फ आयसोलेशनचा निर्णय घेतला होता. पण, आज त्यांची टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सुध्दा याबाबत माहिती दिली. त्यांनी मुख्यमंत्र्याबरोबर आताच बोलणे झाले असून त्यांची तब्येत ठिक असल्याचे सांगितले आहे.
https://twitter.com/myogiadityanath/status/1382234422179602432?s=20