इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षिकेचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. या मृत्यू मागील कारणह समोर आले असून ते धक्कादायक आहे. या महिलेला व्हॅाटसअॅपवर आलेल्या कॅालमध्ये तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तुम्हाला तिची सुटका करायची असेल तर १५ मिनिटांत १ लाख रुपये पाठवा, अन्यथा तिचे व्हिडिओ व्हायल होतील असा दम पोलिस निरीक्षकांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कॅालमुळे या महिलेला धक्का बसला आणि तिला हृदविकाराचा झटका आला.
या कॅालमध्ये आरोपीने आई, मला वाचव असा आवाजही एेकवला. मालती वर्मा (५८) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या अछनेरा येथे मुलींच्या कनिष्ठ माध्यमिक विदयालय येथे शिक्षिका होत्या. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा कॅाल आला होता. त्यानंतर त्यांनी ही घटना आपल्या मुलालाही सांगितली. ज्या फोनवरुन कॅाल आला होता. त्याचा फोन कोड +९२ आहे. तो पाकिस्तानचा आहे. याप्रकरणाची तक्रार गुरुवारी पोलिसांमध्ये देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.