विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
हिंदू धर्मात लग्नानंतर सौभाग्यवती किंवा सुहासिनी म्हणजेच विवाहित स्त्रीच्या जीवनात कुंकू (सिंदूर ), बिंदी, सौभाग्य अलंकार म्हणजे मनी मंगळसूत्र व अन्य दागिने, मेहंदी यासारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. इतकेच नव्हे तर या सर्व गोष्टी विवाहित स्त्रीच्या सौभाग्याच्या प्रतीक आहेत. काही महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सोळासिंगार करतात, पण भारतातील काही समाजामध्ये आगळावेगळा प्रथा-परंपरा आढळून येतात, असाच एक समाज आहे जिथे पती जिवंत असतानाही दरवर्षी काही काळ स्त्रिया विधवांप्रमाणे राहतात. या समुदायाचे नाव आहे ‘गचवाह समुदाय’.
गचवाह या समाजाच्या स्त्रिया अनेक वर्षापासून या प्रथेचे पालन करत आहेत. असे म्हटले जाते की, येथील महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्याची कामना करून दरवर्षी विधवांप्रमाणे जगतात. या प्रथेमागील कारण जाणून घ्या…गचवाह समाजाचे लोक प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेशात राहतात. हे लोक ताडीच्या झाडांमधून सुमारे पाच महिने ताडी काढण्याचे काम प्रामुख्याने पुरुष करतात. या काळात या महिलांचे पती झाडावरून ताडी काढायला जातात, त्या काळात महिला विधवांप्रमाणे राहतात. त्यावेळी ते सिंदूर किंवा बिंदी लावत नाही, तसेच कोणत्याही प्रकारची शोभा करत नाहीत. त्या दु: खी राहतात. कारण त्यांच्या पतीचा जीव धोक्यात असतो.
गचवाह समाजात तारकुळा देवीची कुलदेवी म्हणून पूजा केली जाते. तसेच ज्या काळात पुरुष ताडी काढण्याचे काम करतात, त्या काळात त्यांच्या बायका त्यांच्या सर्व अलंकार या देवीच्या मंदिरात ठेवतात. तसेच ज्या ताडीच्या झाडापासून ताडी काढली जाते, ती खूप उंच असतात आणि थोडीशी चूक ही व्यक्तीच्या मृत्यूचे कारण बनू शकते, म्हणून येथील स्त्रिया या कुलदेवीला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांना सुशोभित करतात त्यांच्या मंदिरात दागिने ठेवतात, आणि स्वतः मात्र विधवाप्रमाणे जिवन जगतात.