निलेश गौतम, सटाणा
गत 50 वर्ष्याच्या कालावधीत जे झाले नाही ते एप्रिल महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .अवकाळी बळीराजाची पाठ सोडायला तैयार नाही या गारपिटीने साधारणतः 25 हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा क्षतीग्रस्त झाला असुन सुमारे एक कोटी मेट्रिक टन कांद्याचे नुकसान झाले आहे.
10 एप्रिल ला झालेल्या गारपिटीने उद्धवस्त झालेला बळीराजा संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळीचा सामना करताना दिसून येत आहे. हजारो हेक्टर वरील कांदा जमिनीतच सडला आहे तर अनेकांनी एकरी 85 ते 90 हजार खर्च करून जमीनीतून वरती काढलेला कांदा जागेवरच सडत असल्याने या कांद्याला जमिनीतीच गाडण्याची तैयारी सुरू केली आहे. अनेकांनी उभ्या कांद्याला रोट्याव्हेटर मारले आहे. तर अनेक जण ट्रॅकटरच्या सहाय्याने या कांद्याला उकीरड्यावर फेकत आहेत.
अनेकांचे कांदे जमीनीतून वरती काढण्याचे काम सूरु असताना रोजच दुपारच्या सत्राला येणारा अवकाळी या कांद्याला मातीमोल करत आहे. अवकाळीची वक्रदृष्टी बळीराजाला आर्थिक खाईत ढकलत असतांना शासनाकडून कुठलीही मदत अजून मिळालेली नाही, आज एका स्थानिक शेतकऱ्याने उद्दिग्न होत आपल्या शेतातील कांद्यावरच अंतिम संस्कार करून आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली.
4 महिने रात्र पहाट करून पिकविलेल्या कांद्याला अश्या प्रकारे तिलांजली देण्याची नामुष्की बळीराजावर आली आहे .हे करीत असतांना बळीराजसह संपूर्ण कुटुंबाला अश्रूंच्या धारा लागत आहेत संपूर्ण शेती एकीकडे उध्वस्त होत असतांना कुटुंबा साठी जगणारा बळीराजा आता हतबल होतांना दिसत आहे.
महागडी प्लास्टिक अच्छादने टाकली तर जमिनीतून खाली पाणी जाऊन काढलेला कांदा ही खराब होत आहे. आहे नाही तो पैसा जमिनीतील पिकासाठी वापरला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकरी 85 ते 90 हजार खर्च करून हाती 85 पैसे मिळण्याची शास्वती नसल्याने कोपलेल्या निसर्गापुढे बळीराजा संपला असच म्हणावे लागेल..
कांदा पिकाला एकरी येणारा खर्च चा तपशील
1)रोप बियाणे सह तयार करणे – 10 हजार
2)शेत तयार करणे – 12 हजार
3)शेणखत – 10 हजार
4)लागवड – 15 हजार
5) 2 वेळा फवारणी 10 हजार
6) कृत्रिम खते – 12 हजार
7) निंदणी – 4 हजार
8) काढणी – 12 हजार
९) मेहनत, वीजबिल, पाणी भरणे मजूर हा वेगळा खर्च
१०) अनेकवेळा वातावरणातील बदलामुळे हा खर्च वाढतो
Unseasonal Rainfall Hailstorm Onion Crop Loss