‘अवकाळीचे वातावरण ३ दिवस,
अक्षय्य तृतीयेपासून निवळणार’
विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यात एक दिवस अगोदर म्हणजे शनिवार दि.२२ एप्रिल (अक्षय तृतीये) पासुनच अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते. ह्या ३ दिवसात तीव्रता कमीच असेल, असे वाटते.
मात्र वरील खान्देश व द. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील चोपडा यावल रावेर जामोद एदलाबाद तसेच भुदरगड शिरोळ क.म.काळ अक्कोलकोट उमरगा निलंगा देवनी किनवट हिमायतनगर धर्माबाद बिलोली देगलूर ह्या भागात मात्र कदाचित अक्षय्यतृतीयेनंतरही अवकाळी वातावरणाचा परिणाम टिकून असण्याची शक्यता जाणवते. मराठवाड्यात आज व उद्या गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
संपूर्ण विदर्भात अवकाळी वातावरण मात्र उद्यापासून पुन्हा डोकावणार असुन त्यापुढील ५ ते ७ दिवस टिकून राहण्याची शक्यता जाणवते. उद्या व परवा तेथे गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही. तेथे वातावरण निवळेल तेंव्हा अवगत केले जाईल.
मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग वगळता ३ जिल्ह्यात मात्र आजपासूनच तेथील अवकाळी वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता जाणवते. सिंधुदुर्गात मात्र वातावरण टिकून असेल. मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यात आज व उद्या उष्णतेची लाटसदृश्य स्थिती जाणवू शकते. उत्तर महाराष्ट्र ते चेन्नईपर्यन्त ‘ वाराखंडिता प्रणाली ‘ टिकून आहे.
इतकेच
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Unseasonal Rainfall Climate Weather Forecast