विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन काही जिल्ह्यांमध्ये शिथील करण्याचे निश्चित झाल्याची घोषणा गुरुवारी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. पण, त्यानंतर गोंधळ उडाला व मंत्री वडेट्टीवार यांनी नंतर हा अद्याप केवळ प्रस्ताव असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे स्पष्ट केले होते, पण, शुक्रवारी मध्यरात्री राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी अध्यादेश काढत वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेत एक स्तर वाढवत तोच प्रस्ताव कायम केल्याचे समोर आले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट (बाधित होण्याचा दर) ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. तर इतर चार टप्यात काही निर्बध कायम ठेवण्यात आले आहे. नाशिक जिल्हाचा स्तर २ मध्ये की ३ मध्ये बसतो याबाबत अद्यापही संभ्रम आहे. नाशिक जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) १८.७१ तर पॉझिटिव्हिटी दर (टक्के) ७.७५ आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश तिस-या स्तरावर होणार आहे. पण, नाशिक महानगरपालिकेचा स्तर वेगळा असणार आहे.
सोमवारपासून राज्यात पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. पहिल्या स्तरात १० जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. दुसऱ्या स्तरात २ जिल्ह्यांचा समावेश आहे.या जिल्ह्यात मॉल आणि थिएटर्स ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. तिसऱ्या स्तरात १५ जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. या सर्व जिल्ह्यात निर्बंधासह सेवा सुरु राहिल.
पहिल्या स्तराचे हे आहे निकष
ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे
ऑक्सिजनचे बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे
हे सुरू होणार
मॉल्स, हॉटेल्स, दुकाने पुर्वीप्रमाणेच सुरू होतील
क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्णपणे सुरू होतील
चित्रपट गृहे, मल्टीप्लेक्स सुरू होतील
चित्रपट शुटींगला परवानगी
सार्वजनिक कार्यक्रम व लग्न सोहळ्यांना मान्यता
जमावबंदी राहणार नाही
जीम सुरू होणार
एसटीची सेवा १०० टक्के क्षमतेने
—
एकूण ५ स्तरात अनलॉकचे हे आहे निकष
पहिल्या स्तर – (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ टक्क्यांपेक्षा कमी टक्के भरलेले)
दुसरा स्तर – (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्के भरलेले)
तिसऱ्या स्तर – (पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के, ऑक्सिजन बेड्स ४० टक्के भरलेले)
चौथा स्तर – (पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के, ऑक्सिजन बेड्स ६० टक्के भरलेले)
पाचवा स्तर – (पॉझिटिव्हीटी रेट २० टक्के, ऑक्सिजन बेड्स ७५ टक्के भरलेले)
अनलॉकचे हे आहे निकष
राज्यातील जिल्ह्यातील आॅक्सिजन बेड्सची ही आहे स्थिती
राज्यातील जिल्ह्याचा हा आहे पॉझिटिव्हीटी रेट