पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन LiFE आणि नेट झिरो इंडियाच्या वचनबद्धतेने प्रेरित झालेल्या परिवर्तनवादी चळवळीला 19 ऑगस्ट 2023 रोजी प्रारंभ होत आहे. खासदार आणि माजी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या चळवळीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ‘U75: अ नॅशनल मूव्हमेंट ऑफ नेट-झिरो युनिव्हर्सिटी कॅम्पस’ नावाची चळवळ संपूर्ण भारतातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू होत आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि कौशल्य निर्मितीमध्ये आवश्यक भूमिका बजावण्यासाठी ही चळवळ अतिशय मोलाची आहे. U75 चा पुढाकार भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानंतर आणि अमृत काल प्रारंभाच्या पहिल्या वर्षासाठी समर्पित करण्यात आला आहे.
रोडमॅप तयार होणार
ग्रीन TERRE फाउंडेशन (GTF) द्वारे आयोजित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) द्वारे होत असलेल्या या कार्यक्रमात 30 विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना एकत्र आणणारा आहे. याद्वारे कार्बन न्यूट्रल कॅम्पससाठी रोडमॅप तयार करणे आणि प्रारंभिक मार्गदर्शन प्रदान करण्यास सक्षम करेल. विद्यार्थी आणि प्राध्यापक त्यांच्या स्वतःच्या कॅम्पसमधील अनुभवाच्या माध्यमातून नेट झिरोचे भविष्यातील दूत असतील.
१०० विद्यापीठांचा सहभाग
खासदार व माजी मंत्री प्रकाश जावडेकर आणि युनायटेड नेशन्सचे माजी अंडर सेक्रेटरी जनरल एरिक सोल्हेम हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. तर ही चळवळ IIT चे माजी विद्यार्थी आणि संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे (UNEP) चे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, यांच्या नेतृत्वाखालीकार्यरत राहणार आहे. 100 विद्यापीठांनी या उपक्रमाचा भाग होण्यासाठी अधिकृतपणे संमती दिली आहे आणि नेट-झिरो कॅम्पसच्या दिशेने कृती सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. पश्चिम विभागातील 30 विद्यापीठांसाठी ही कार्यशाळा पुणे विद्यापीठातर्फे आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात आणखी तीन कार्यशाळा होणार आहेत.
प्रा. अनिल सहस्रबुद्धे- NETF (नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम) चे अध्यक्ष आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. टी. सीताराम हे या चळवळीस सहकार्य करत आहेत आणि कार्यशाळेतील विद्यार्थी, प्राध्यापकांच्या प्रतिनिधींना ते संबोधित करतील. अलीकडेच, ग्रीन टेरे फाउंडेशनने केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नेट झिरो विद्यापीठांवर शिक्षण मंत्रालयाच्या AICTE सोबत सामंजस्य करार केला आहे. युनेस्को, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि NITI आयोग U75 द्वारे समर्थित सर्व विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये गती प्राप्त करण्यासाठी आहे.
विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये विजेच्या वापरात कार्यक्षमता आणणे, पाण्याच्या वापरात बचत आणि प्रक्रिया करून पुनर्वापर करणे, कचरा प्रबंधनाची कार्यक्षम व्यवस्था करणे, वृक्ष लागवड करणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि जलसंधारण करणे असे विविध कार्यक्रम करण्यात येतील. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग व पुढाकार असेल. त्यातून भावी पिढीवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार होतील. या उद्देशाने हि चळवळ काम करणार आहे.
धोकादायकपणे वाढणाऱ्या हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर, हायड्रोजन ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञानासह उत्सर्जन-मुक्त तंत्रज्ञानासाठी नाविन्यपूर्ण उपायांना ग्रीन TERRE फाउंडेशन द्वारे प्रोत्साहन दिले जाते. कॅम्पसला कौशल्य निर्मितीसाठी प्रत्यक्ष प्रयोगशाळा म्हणून प्रोत्साहित केले जाईल. नवीन शैक्षणिक धोरण 2020 पासून अपेक्षेनुसार विद्यापीठांचे नेटवर्क, भागीदारी आणि सहयोगी संशोधनास अनुमती देईल. कार्यशाळेला संयुक्त राष्ट्र, ऊर्जा मंत्रालय, UNDP, ASSOCHAM आणि डिजिटल वर्ल्डचे तज्ज्ञ संबोधित करतील.
University Campus Net Zero National Campaign Initiative
Sustainable Development