मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल्स, शो रुम्स, लोकल, विमानसेवा, रेल्वेसेवा आदी ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणी प्रवेशासाठी राज्य सरकारने युनिव्हर्सल पास देण्याची सुविधा कार्यन्वित केली आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. हा पास कसा मिळवायचा याची प्रक्रिया पुढील प्रमाणे
१. सर्वप्रथम खालील लिंकवर क्लिक करावे
https://epassmsdma.mahait.org
२. वेबसाईटवर आपल्याला ४ पर्याय दिसतील.
३. तुम्हाला तुमचा स्वतःचा युनिव्हर्सल पास हवा असल्याने उजव्या बाजूला वर असलेला पर्याय (Universal pass for double vaccinated citizens) हे दिसेल त्यावर क्लिक करावे
४. कोरोना लस घेण्यासाठी आपण जो मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे तो टाकावा
५. आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल.
६. ओटीपी क्रमांक आपण वेबसाईटवर टाकावा
७. आपल्याला आपले नाव, लस कधी घेतली, लाभार्थी क्रमांक आदि माहिती दिसेल
८. आपण आपला पासपोर्ट फोटो अपलोड करावा
९. अटी मान्य असल्याची टीक करावे
१०. पाससाठी अर्ज करणे (अप्लाय) वर क्लिक करावे.
११. दुसरा डोस घेतल्याच्या १४ दिवसानंतर हा पास तयार होईल आणि तो तुम्हाला मिळेल