अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा शहरातील विंचूर प्रकाशा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हे खड्डे बुजवावे यासाठी राष्ट्रवादीने अनोखे आंदोलन केले. हे खड्डे बुजवावे यासाठी पाऊस पडत असतानांच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या खड्यामध्ये पोहचलेत भ्रमणध्वनी वरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला संपर्क साधला. त्यानंतर शाखा अभियंता जगदीश सपकाळे यांना आंदोलनस्थळी आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यांना खड्यात उतरविले आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या कामांची चांगली निगा ठेवली जाते. त्याबद्दल आपण पेढा घ्यावा अशी विनंती केली. सपकाळ यांनी देखील पदाधिकाऱ्यांचा रोष पाहता पेढा खाल्ला व पुढील ३६ तासात खड्यांची डागडूजी केली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर पावसात सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.
सटाणा शहरातील विंचुर प्रकाशा महामार्गावरील नगरपालिका कार्यालयासमोर नाशिक नाक्याजवळ मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गुजरात मुंबईकडे या रस्त्यावरून अवजड वाहणांची २४ तास रहदारी असते. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी या रस्त्यावरुन येजा करावी लागते. सकाळच्या प्रहारी शेतकऱ्यांना दुधविक्री करण्यासाठी याच मार्गावरून शहरात प्रवेश करावा लागतो. तर महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी-विद्याथीनींना सायकल, मोटरसायकल व स्कुटी याच रस्त्यावरुन चालवावी लागते. या सर्व घटकांना खड्यांमधूनच जा ये करावी लागते. त्यातच वारंवार या खड्यामध्ये अपघात, वाहणांचे नुकसान तर होतेच मात्र मनुष्याला अनेकवेळा गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते त्यामुळे हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शहर कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज सोनवणे, शहर चिटणीस नितीन सोनवणे, संजय सोनवणे, विलास सोनवणे, किशोर ह्याळीज, संजय पवार, अमोल सोनवणे, गौरव निकम, मनोज देसले, सुनिल पटेल, दत्तु खैरणार, लक्ष्मण सोनवणे, नरेंद्र सोनवणे, गोरख सोनवणे, राहुल ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.