इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी सध्या विशेष चर्चेत आल्या आहेत. निमित्त आहे ते गोव्याचे. गोव्यामध्ये इराणी यांचा बार असून त्यांच्या कन्या तो सांभाळतात, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच एकच गदारोळ उठला आहे. यात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे.
देशभरातील कोणतीही राजकीय व्यक्ती असो, तिने जनतेच्या कल्याणासाठी आपल्या कामाचा आणि ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, परंतु काही राजकारणी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी त्याचा वापर करतात, असा आरोप होतो. आणि तो काही बाबतीत खरा ही ठरलेला आढळून येतो. अनेक राजकीय व्यक्तींचे आपल्या मुलाबाळांसाठी राजकीय शक्तीचा वापर केलेला दिसून येतो, त्यामुळे अशा राजकीय व्यक्ती कालांतराने अडचणी येतात. सध्या स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसने आरोपांची राळ उठवली आहे.
सध्या देखील केंद्रात सत्तेवर असलेल्या एका व्यक्तीच्या संदर्भात असाच प्रकार घडत आहे असे म्हटले जाते, मुलीच्या गोव्यातील कॅफेच्या प्रकरणात महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आसगाव ग्रामपंचायतने माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी सिली सोल्स कॅफे व बार चालवला जात आहे, त्याच्या कोणत्याही निर्माणाची किंवा दुरुस्तीची परवानगी घेण्यात आलेली नाही.
https://twitter.com/ANI/status/1551165574666805248?s=20&t=GlFd0aYOYfh3JhD05xtgTQ
या प्रकरणी आता गोवा उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त नारायण गाड यांनी रॉड्रिग्ज यांच्या तक्रारीवरुन सिली सोल कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, ज्यात हॉटेलच्या परवान्याची वैधता सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच यावरील सुनावणी उद्या, शुक्रवार दि. 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
तर ग्रामपंचायत सचिवांनी गोव्याचे एक वकील एरेस रोड्रिग्स यांना आरटीआय अंतर्गत पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आसगाव ग्रामच्या घर क्रमांक ४२५साठी २०१९पासून आतापर्यंत अँथनी डीगामा किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्माण किंवा दुरुस्तीसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही. या भूखंडावर सिली सोल्स कॅफे व बार चालवला जातो. यासाठी गोवा सरकारकडून अँथोनी डीगामाने लायसन्स घेतले आहे. अँथोनीचा २ वर्षांपूर्वी मृत्यू झाला.
दरम्यान, काँग्रेसने आरोप केला आहे की, हा कॅफे स्मृती इराणी यांची मुलगी जोईस चालविते. तर स्मृती इराणी यांचा दावा आहे की, त्यांची मुलगी केवळ १८ वर्षांची आहे व सध्या महाविद्यालयात शिकते आहे. तिचा या कॅफेशी किंवा बारशी काहीही संबंध नाही. तथापि, स्मृती इराणी यांच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट समोर आल्या आहेत.
https://twitter.com/pbhushan1/status/1551154249869901824?s=20&t=GlFd0aYOYfh3JhD05xtgTQ
याविरोधात आज गोव्यात युवक काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. स्मृती इराणी यांचा आसगाव बार्देश येथील बेकायदेशीर कॅफे आणि बार त्वरित बंद करण्यासाठी युवक काँग्रेसच्या सदस्यांनी कुलूप आणि चावी पोलिसांकडे सुपूर्द केली. तसेच स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी यावेळी युवा कॉंग्रेसच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. एकंदरीत परिस्थितीमुळे स्मृती इराणी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे या हॉटेलच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी संबंधित खात्याकडून घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. आता हे हॉटेल ज्या पंचायत क्षेत्रात येतं, त्या आसगाव पंचायतीनेही परवानगी न दिल्याचं स्पष्ट केल्यामुळे रॉड्रिग्ज यांनी पंचायत संचलनालयाकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. पंचायतीला स्मृती इराणी यांचं हे हॉटेल सील करण्याचे आणि बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे.
Union Women and Child Welfare Minister Smriti Irani Goa Bar Daughter Controversy