नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा आपल्या नाशिक जिल्हा दौऱ्यामध्ये आदिवासी शेतकरी- शेतमजुरांच्या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच ते सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील एकलव्य निवासी विद्यालयाचे भूमिपूजन करतील. पेसा ग्रामपंचायत मधील प्रतिनिधींशी ही ते चर्चा करणार आहेत. आदिवासी स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांशी संवाद, आदिवासी कला पथक आणि खाद्यसंस्कृती याचा ही ते आस्वाद घेतील अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा दिंडोरीच्या खासदार डॉ. भारतीताई पवार यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या पुढाकाराने केंद्रीय आदिवासी मंत्र्यांच्या उपस्थितीत हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारतंत्र्याच्या मुक्तीच्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या हजारो वनवासी माता भगिनी, युवक, नागरिक जनजातीय पूर्वजांना मानाचा मुजरा करण्यासाठी हतगड येथील कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस आ. देवयानीताई फरांदे, आ. सिमाताई हिरे, आ. डॉ. राहुल आहेर, आ. दिलीप बोरसे , आ. ऍड राहुल ढिकले यांनी शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते, नागरिक हितचिंतक यांना उद्देशून केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता वणी- सापुतारा रस्त्यालगत किल्ले हातगड ता. सुरगाणा प्रमुख उपस्थिती केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुनजी मुंडा, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार भारतीताई पवार उपस्थित राहणार आहेत. हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या सहकार्याने ‘इट राईट’ अर्थात आदिवासी खाद्यसंस्कृती मेळा होणार आहे. या ठिकाणी आदिवासी हस्तकला प्रदर्शन आणि अनुषंगिक कार्यक्रम होणार आहेत.
उद्या 13 मे रोजी सकाळी 11 वा. हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी भगवान बिरसा मुंडा नगरी येथे केंद्रीय मंत्री अर्जुनजी मुंडा यांच्या हस्ते एकलव्य निवासी शाळेचा इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न होईल. त्या आधी सकाळी 10:30 वा स्थळ शिंदे (दिगर) सुरगाणा येथे संपन्न होईल. त्यानंतर हरगड पायथ्याशी बिरसा मुंडा नगरी मध्ये आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळावा संपन्न होणार आहे.
14 मे रोजी महात्मा नगर येथे ‘एक कदम स्वास्थ की ओर’ या संकल्पने ला अनुसरून आरोग्य विषयक जनजागृती मध्ये महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड येथे सकाळी 6 ते 6.30 दरम्यान वॉकेथॉन आणि 6.30 ते 7 30 दरम्यान सामूहिक योग शिबिर संपन्न होणार आहे. यामध्ये नाशिक योगा असोसिएशन, योग विद्या धाम योग विद्या गुरुकुल तसेच शहरातील योग तज्ञ, आचार्य, विद्यार्थी, योगा क्लब आणि विविध मंडळ सहभागी होणार आहेत. या ठिकाणी योग प्रात्यक्षिक, शयन स्थितीतील आसने बैठक स्थितीतील आसने विपरीत स्थितीतील, चाचणी दंड स्थितीतील आसने वृक्षासन, त्रिकोणासन, शवासन प्राणायाम इत्यादी व्यायाम प्रकार प्रात्यक्षिक होणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना शहर जिल्ह्यातील नागरिकांनी, आदिवासी बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांनी केले आहे. या उपक्रमात भाजपा पदाधिकारी, सर्व शहर/जिल्हा कार्यकारिणी, शहर जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ही शहर- जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे.
नाशिक योगा असोसिएशन, योग विद्या धाम, योग विद्या गुरुकुल तसेच शहरातील योग तज्ञ, आचार्य, विद्यार्थी, योगा क्लब आणि विविध मंडळ, योग प्रात्यक्षिक शयन स्थितीतील आसने, बैठक स्थितीतील आसने, विपरीत स्थितीतील, चाचणी दंड स्थितीतील आसने वृक्षासन, त्रिकोणासन, शवासन प्राणायाम इत्यादी वरील सर्व कार्यक्रमांना शहर जिल्ह्यातील नागरिकांनी, आदिवासी बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे आणि जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक शहर-जिल्हा कार्यकारिणी मधील सर्व पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी कार्यरत आहेत.