इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विमानातून प्रवास करतेवेळी एका प्रवासी महिलेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दिसल्या. त्यांनी तातडीने त्यांच्या जवळ जात महागाईचा प्रश्न उपस्थित केला. घरगुती गॅस सिलेंडरसह इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर का वाढत आहेत, असा या महिलेने विचारले. यासंदर्भात इराणी यांनी या महिलेकडे कुस्तित नजरेने पाहिले. तू कोण आहेस, असा उद्धट सवालही केला. विशेष म्हणजे, प्रश्न विचारणाऱ्या महिलेने हा सर्व प्रकार पहिल्यापासून आपल्या मेबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला. त्यामुळे हा सर्व प्रकार आता उजेडात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. या महिलेच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळतानाच कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/dnetta/status/1513055814558560263?s=20&t=IgFQGzRnZLDTSnSt-nbL7g