नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. ते आरपीआयचे अध्यक्ष आहेत. यापेक्षा ते कवी आणि हजरजबाबी आहेत. त्यांच्या कविता हा कायमच चर्चेचा विषय असतात. सध्या संसदेचे सत्र सुरू असून यादरम्यान आठवलेंनी केलेल्या कवितेमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील हसू आवरले नाही.
रामदास आठवले कुठेही गेले की त्यांच्या कविता या गाजत असतात. ते अत्यंत शीघ्रकवी आहेत. कुठल्याही प्रसंगाला साजेसी भावनात्मक कविता ते सादर करून टाकतात. संसदेत असाच एक किस्सा घडला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचे केंद्र बनलेले दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झाले. अनेक वादविवाद, चर्चा आणि गदारोळादरम्यान आज या विधेयकावर राज्यसभेमध्ये मतदान झाले. तेव्हा हे विधेयक पारित करण्याच्या बाजूने तब्बल १३१ सदस्यांनी मत दिले. तर या विधेयकाविरोधात १०२ मते पडली. या विधेयकास रामदास आठवेलांनी कवितेच्या माध्यमातून समर्थन दिले. त्यावेळी, भाषण करताना त्यांनी आम आदमी पक्षाला टोला लगावला.
आठवलेंची कविता
‘अमित भाईंका इतना अच्छा आ गया है बिल
अमित भाईंका इतना अच्छा आ गया है बिल
लेकीन सामने वालों को हो रहा है फील
नरेंद्र मोदीजीं के पास है, बहुत अच्छी वील
लेकीन दिल्ली मे हो रही है दारु के ठेके की डील
नरेद्र मोदी और अमित शहा की अच्छी जम गई जोडी
फिर काँग्रेस और आपवालों की कैसे आगे जाएगी गाडी
नरेंद्र मोदीजी जानते है जनता की नाडी
इसलिए बढाई है, मैने अपनी दाढी’
आठवले यांच्या या कवितेने संसदेत उपस्थित असलेले अमित शहा यांच्यासह सर्व सदस्य हसून लोटपोट झाले.
संजय राऊत यांचीही कविता
रामदास आठवले यांच्याप्रमाणेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सत्ताधाऱ्यांवर टीका करणारी रचना सादर केली.
मत पुंछो के इस दौर मे क्या क्या नही बिका
आपके आँखो की शरम तक आपने बेच दी
कवि गोपालदास यांच्या या काव्यपंक्ती वाचून दाखवत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, तुमच्या डोळ्यात लाजसुद्धा उरली नाही, असेही राऊत यांनी म्हटले.
Union Minister Ramdas Athawale Poem in Parliament