नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री आणि पेट्रोलियम व नॅच्युरल गॅस मंत्री (राज्य) रामेश्वर तेली यांनी नाशिकच्या सातुपर येथील क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयीन कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त ईपीएस-१ – १९९५ या योजने अंतर्गत नव्याने सुरू केलेल्या “प्रयास” या योजने अंतर्गत या महिन्यात सेवा निवृत्त होणाऱ्या पेंशन धारकांना “पेंशन पेमेंट ऑर्डर” चे वाटप करण्यात आले. ईपीएस १९९५ या योजने अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या महिन्यात ते सेवानिवृत्त होतात त्यांना त्या महिन्याच्या शेवटी पेंशन पेमेंट ऑर्डर दिली जाते व पेंशन त्यांच्या खात्यात जमा केली जाते.
या कार्यक्रमास क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी त्यांचे स्वागत केले व कार्यालयास भेट दिल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास भविष्य निधी कार्यालयातील अधिकारी गणेशप्रसाद आरोटे (भविष्य निधी आयुक्त-II), के के कुंभार (सहायक भविष्य निधी आयुक्त) व इतर सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग हजर होते.