मनमाड – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे उपस्थिती मध्ये आज मनमाड शहरात शासकीय कामकाज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक जनतेच्या संवेदनशील प्रश्नांन संदर्भात केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी उपस्थित अधिकारी वर्गाची चांगलीच झाडा झडती घेत त्यांना धारेवर धरले. मनमाडच्या आरोग्य व्यवस्था संबंधित माहितीचा आढावा घेतला असताना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना विनाकारण खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते यावरून डॅा. पवार यांनी तीव्र शब्दात नाराजी प्रगट केली व तातडीने लेखी अहवाल मागवला. कोरोना संदर्भातील उपाययोजनाच्या सूचना दिल्या आणि मनमाड सारख्या मोठ्या शहरात १०८ ही रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध करण्यासाठीच्या कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांन दिल्या. तहसील कार्यालयाकडून विद्यार्थीसाठी कागदपत्रामध्ये होणाऱ्या दिरंगाई बद्दल आणि रेशनकार्ड संबंधित समस्या बाबतीत ही डॉ. पवार यांनी कडक सूचना दिल्या. मनमाड शहरातील महावितरणच्या लपंडाव बद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या शिवाय केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे सविस्तर माहिती फ़लक लावण्याच्या सूचना सर्व विभागाना केल्या. या शिवाय मनमाड शहरातील वाहतूक कोंडी ,मनमाड नगरपालिका संबंधित समस्या, मनमाड रेल्वे संबंधित समस्या शेतकऱ्यांनाच्या खत संदर्भात ही या बैठकीत डॉ भारती पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत डॉ भारती पवार यांनी विचारलेल्या अनेक अभ्यास पूर्ण प्रश्नांनची उत्तरे देतांना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली. या महत्वपूर्ण बैठकीत भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ ,संघटन सरचिटणीस नितिन परदेशी, धीरज भाबड यांनी जनतेच्या समस्या व तक्रारी डॅा. पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या बैठकीत भाजपा आर्थिक सेलचे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार ,डॉ उमेश काळे ,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी ,व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत ,जेष्ठ नेते उमाकांत राय,भाजप अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष जलील अन्सारी,शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा भाजप दिव्यांगआघाडीचे शहर अध्यक्ष दीपक पगारे, शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे, अनंता भामरे, नारायण जगताप, डॉक्टर आघाडीचे शहर अध्यक्ष डॉ सागर कोल्हे, राज परदेशी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष आशिष चावरिया, शहर सचिव सुमेर मिसर ट्रास्पोर्ट आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटिल, ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद सानप,नमो फाउंडेशनच्या अध्यक्ष वर्षा झालटे, विजय देशमुख, क्रिश फुलवाणी, सौ वैशाली वाणी आदी प्रमुख मान्यवरांन सह येवला विभागाचे प्रांत अधिकारी नांदगावचे तहसीलदार मोरे, मनमाड नगरपालिकेचे मुख्यअधिकारी सचिन पटेल, मनमाड पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रल्हाद गीते,तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगताप ,महावितरणचे विभाग मुख्य अभियंता तडवी सहाय्यक अभियंता शिंदे रेल्वे विभागाचे मुख्य एईएन विशाल सैय्यद,पीडब्लूडीचे खैरनार या प्रमुख अधिकाऱ्यांन सह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. या बैठकीचे संयोजन भाजपा शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले. या बैठकीत मनमाड शहरातील व ग्रामीण परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी आपल्या विविध तक्रारी व समस्या मांडल्या या आढावा बैठकी मुळे सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.