बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी छोटा राजन व छोटा शकील यांना सुपारी दिली, नारायण राणेंचा गंभीर आरोप

by India Darpan
ऑक्टोबर 7, 2022 | 5:47 pm
in राज्य
0
narayan rane e1665144618788

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केला. ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला.

अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व, महागाई यासारख्या मुद्द्यांचा विसर पडला होता. सत्ता गेल्यावर मात्र त्यांना हे मुद्दे आठवू लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांमुळे शिवसैनिकांना सामाजिक कार्याची, विधायक कामाची प्रेरणा मिळत असे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मात्र शिव्या, शाप देण्याखेरीज काहीच केले नाही. हिंदुत्वाचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वाटचालीत काहीही योगदान दिले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी योगदान दिले आहे, असेही राणे म्हणाले

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. मात्र भारतीय जनता पार्टीला दगा देऊन मुख्यमंत्रीपद मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. मोदी सरकारने कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्न-धान्य दिले. त्यावेळी राज्यात सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसाला दमडीही दिली नाही. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आपली पात्रता तपासावी असेही राणे म्हणाले.

राणे म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे मंत्रालयाकडे फिरकतही नसत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचा एकही निर्णय ठाकरे सरकारने घेतला नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर उद्धव ठाकरे करतात त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामही उद्धव ठाकरे यांना पूर्ण करता आले नाही. कोरोना काळात अनेक व्यवसाय तोट्यात गेले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने मिळवलेल्या नफ्याची चौकशी करण्यासंदर्भात गौरी भिडे यांनी केलेल्या याचिकेचा उल्लेखही श्री.राणे यांनी केला. या याचिकेमुळे ‘कुणाची खोकी’ दैनिक सामना फायद्यात दाखवण्यासाठी वापरली गेली, हे उघड होईल असा टोलाही श्री.राणे यांनी लगावला.

Union Minister Narayan Rane Allegation on Uddhav Thackeray
BJP Politics

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इयत्ता तिसरीपासून सुरू होणार परीक्षा; शिक्षण मंत्री केसरकरांची माहिती

Next Post

गोविंदनगर पूलाचे व बाजीरावनगर रस्त्याचे रूंदीकरण करा; आयुक्तांना शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे निवेदन

Next Post
IMG 20221007 WA0035 e1665145073825

गोविंदनगर पूलाचे व बाजीरावनगर रस्त्याचे रूंदीकरण करा; आयुक्तांना शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे निवेदन

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011