इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही वस्तू खरेदी करताना सर्वसामान्य नागरिक बार्गेनिंग तथा घासागीस करतात. विशेषतः महिला भाजी असो की, साडी घेण्यासाठी दुकानदारांकडे घासाखीस करतात, परंतु श्रीमंत किंवा प्रतिष्ठित व्यक्ती दुकानदाराने मागितलेल्या किमतीमध्ये वस्तू घेतात. मात्र एका केंद्रीय मंत्र्यांनी केवळ शिल्लक कारणासाठी घसाखीस केल्याचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते रस्त्यावरच मक्याचे कणीस खरेदी करत आहेत. परंतु त्यांना या कणसाची किंमत जास्त असल्याचं वाटते, म्हणून इथे मक्याचं कणीस फ्री मिळते असेही ते म्हणतात.
पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणे हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते. परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणीस सहज उपलब्ध होत असतात. विशेष म्हणजे ही कणीस खाण्याचे काही फायदे आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी स्वतः हा व्हिडीओ ट्विट केला आहे. इथे त्यांनी महाग असलेल्या भागाचा उल्लेख केला नाही. पण ही गोष्ट व्हिडीओत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून मंत्र्यांना आता महागाई समजली असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. फग्गन सिंह यांनी शेअर केलेला व्हिडीओ मध्यप्रदेशातील सिवनी ते मंडला दरम्यानचा आहे. स्थानिक शेतकरी आणि छोट्या दुकानदारांकडून वस्तूंची खरेदी केली पाहिजे. त्यांना रोजगार आणि आपल्या भेसळमुक्त वस्तू मिळतील असं त्यांनी या व्हिडीओसोबत लिहिले आहे.
आज सिवनी से मंडला जाते हुए। स्थानीय भुट्टे का स्वाद लिया। हम सभी को अपने स्थानीय किसानों और छोटे दुकानदारों से खाद्य वस्तुओं को ख़रीदना चाहिए। जिससे उनको रोज़गार और हमको मिलावट रहित वस्तुएँ मिलेंगी। @MoRD_GoI @BJP4Mandla @BJP4MP pic.twitter.com/aNsLP2JOdU
— Faggan Singh Kulaste (Modi Ka Parivar) (@fskulaste) July 21, 2022
या व्हिडीओमध्ये फग्गन सिंह हे गाडीतून उतरून मक्याचं कणीस देण्यासाठी सांगतात. ते जेव्हा त्याचा भाव विचारतात तेव्हा समोरची व्यक्ती त्यांना ३ कणसांची किंमत ४५ रूपये सांगते. यावर मंत्री त्या व्यक्तीला इतकं महाग देतो का? इथे तर मक्याचं कणीस फ्री मिळतं असं ते सांगतात. यावर दुकानदार त्यांना आपण एक कणीस ५ रूपयांना विकत आणल्याचं सांगतो. यानतंर ते त्याचं नाव विचारत मक्याची कणसे डझनाच्या भावाने का किलोच्या दराने देतो असं विचारतात. त्यानंतर ते आपल्या खिशातून पैसे काढून पुढील प्रवासासाठी निघून जातात, मात्र आता याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मक्याच्या कणसाला हिंदीमध्ये ‘भुट्टा’ म्हटले जाते. याला मकई, मक्का, भुट्टा किंवा कॉर्नही म्हटले जाते. याचे वैज्ञानिक नाव ‘जी-मेज’ आहे. धान्य वर्गात येणाऱ्या मक्याचे उत्पादन कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये मोठ्याप्रमाणावर होते. भारतात याचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, पॉप कॉर्न, स्वीट कॉर्न वैगेरे. मक्याचे कणीस जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध असतात. हे व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे जो ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. याशिवाय हाडे आणि केसांनाही चांगले असते. यात व्हिटॅमिन ए असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.
Union Minister Fagan Singh Kaluste Video Viral Corn buying Corn Roadside Vendor